Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) फ्रान्सचा सुपर हेवीवेट बॉक्सरला क्वॉर्टर फायनलमध्ये सामन्यातून बाद करताच थेट रिंगजवळच जवळपास एक तास तो विरोध प्रदर्शन दर्शवत बसून होता. त्याला मुद्दामून प्रतिस्पर्धी खेळाडूला डोक्यावर मारण्याच्या कारणाने बाद करण्यात आलं होतं. रविवारी झालेल्या दुसऱ्या फेरीतील या सामन्यात केवळ चार सेकंद बाकी असताना पंच एंडी मुस्थाचिहियो याने फ्रान्सचा बॉक्सर माउराद एलिव (Mourad Aliev) याला बाद घोषित केलं. पंचाच्या मते एलिवने मुद्दामून प्रतिस्पर्धी ब्रिटिश बॉक्सर फ्रेजर क्लार्कच्या डोक्यावर मारलं होतं.
पंचाने निर्णय घोषित करताच एलिव बॉक्सिंग रिंगजवळीत शिड्यांवर बसला. फ्रान्स संघाचे अधिकारी देखील पाणी घेऊन एलिवशी बोलायला आले. तेव्हा त्याने अनुवादकाकडून बोलताना सांगितले की,“मी अशाप्रकारे रिंगजवळ बसून पंचाचा निर्णय़ चूकीचा असल्याचं सांगयचा प्रयत्न करत होतो. मी प्रामाणिकपणे चूकीच्या गोष्टीविरुद्ध लढण्याचा प्रयत्न करतो. या चूकीच्या निर्णयामुळे आयुष्यभराची मेहनत वाया जाईल.” 30 मिनिटाहून अधिक काळ एलिव त्याठिकाणी बसल्यानंतर ऑलिम्पिक अधिकाऱ्यांनी एलिवसह फ्रान्स टीमशी बोलले. त्यानंतर एलिवने प्रोटेस्ट थांबवल. तो म्हणाला, ”मी हा सामना जिंकू शकलो असतो. पण मला बाद घोषित करण्यात आल्यामुळे माझी संधी हुकली. मी संपूर्ण आयुष्य यासाठी तयारी केली होती. त्यामुळे राग येणं स्वाभाविक आहे.”
एलिव आणि क्लार्क यांच्यातील सामना चांगलाच अटीतटीचा झाला. एलिव सुरुवातीपासून चांगला खेळत होता. पण अखेर बाद झाल्याने क्लार्कचं पदक पक्कं झालं. यावेळी क्लार्क म्हटला, “मला एलिवने मुद्दाम मारलं की नाही हे मला माहित नाही. मी सामन्यानंतर त्याला भेटून शांत राहण्यासही सांगितलं.” एलिवने पहिला राउंड 3-2 जिंकला होता. पण नंतर त्याला बाद घोषित करण्यात आल्याने तो पराभूत झाला.
इतर बातम्या:
Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूला पदक मिळवण्याची शेवटची संधी, असे असेल आव्हान
Tokyo Olympics 2021: बॉक्सर लवलीनाचं पदक निश्चित, सेमीफायनलमध्ये टर्कीच्या बॉक्सरशी भिडणार
(France boxer mourad aliev sit on protest against referee decision at tokyo olympics)