Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचा सेमीफायनलमध्ये पराभव, भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न तुटलं

| Updated on: Jul 31, 2021 | 7:08 PM

भारताला यंदा सुवर्णपदक मिळण्याची सर्वाधिक आशा बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूकडून होती. पण सेमी फायनलच्या सामन्यात सिंधूला पराभव पत्करावा लागल्याने सिंधूसह भारताचे सुवर्णपदकाचे स्वप्नही तुटले आहे.

Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचा सेमीफायनलमध्ये पराभव, भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न तुटलं
पीव्ही सिंधू
Follow us on

Tokyo Olympics 20-2021 : रियो ओलिम्पिक 2016 मध्ये अंतिम सामन्यापर्यंत मजल मारुन भारताला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या भारताच्या स्टार महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला (PV Sindhu) टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics-2020) पराभव पत्करावा लागला आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात सिंधूला महिला एकेरी वर्गात दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यात प्रतिस्पर्धी चीनी ताइपेच्या ताई त्जू यिंग (Tai Tzu Ying) हिने मात दिली. सामन्यात 21-18 आणि 21-12 अशा सरळ सेट्समध्ये सिंधूला पराभव पत्करावा लागला.

सिंधूने सामन्यात सुरुवातीपासून कडवी झुंज दिली पहिल्या सेटमध्ये पुढे असणारी सिंधून हळूहळू मागे पडली आणि नंतर ताईने तिला परत पुढे येऊच न दिल्याने सिंधू पराभूत झाली. दोघांमधील सामना अत्यंत रोमहर्षक झाला. पण ताई हिने आपल्या कमी उंचीचा फायदा घेत सिंधूला कोर्टवर थकवून एक वेगळी रणनीतीने सामना जिंकला.

असा झाला पहिला सेट

सामन्यात ताई त्जू हिने वर्चस्व ठेवले होते. मात्र पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला सिंधू 5-2 च्या फरकाने ताईवर आघाडी घेतली होती. पण त्यानंतर ताईने आक्रमक खेळ करत काही गुण मिळवले. सिंधूकडूनही काही चूका झाल्याने ताईला आणखी गुण मिळाले. पण सिंधूने जबरदस्त झुंज देत पहिल्या ब्रेकपर्यंत 11-8 अशी आघाडी घेतली. ब्रेकनंतर ताई हिने 11-11 ची बरोबरी साधली. नंतर संपूर्ण सेट संपेपर्यंत दोघीही पुढे मागे अशाच स्कोरवर होत्या मात्र अखेर ताईने आघाडी घेत सेट 21-18 ने जिंकला.

दुसऱ्या सेटमध्येही सिंधू पराभूत

दुसऱ्या सेटमध्ये ताई त्जूने पहिला गुण मिळवला. दुसऱ्या सेटमध्ये ताईने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड जमवून ठेवली होती. सिंधूनेही अटीतटीचा खेळ दाखवला पण काही चूकांमुळे सतत ताई हिलाच गुण मिळत होते. ज्यामुळे सुरुवातीपासूनच ती सामन्यात आघाडीवर होती. त्यानंतर मात्र ताइ त्जूने सिंधूसा सामन्यात पुनरागमन करु दिलं नाही आणि अखेर सामना सिंधूच्या हातातून 12-21 च्या फरकाने निसटला.

इतर बातम्या:

Tokyo Olympics 2021: बॉक्सर लवलीनाचं पदक निश्चित, सेमीफायनलमध्ये टर्कीच्या बॉक्सरशी भिडणार

Tokyo Olympics 2021: भारताला मोठा झटका, मेरिकोमचा पराभव; ऑलम्पिकमधील दुसऱ्या पदकाच्या आशा संपल्या

(In Tokyo Olympic PV Sindhu lost semifinal match against tai tzu ying)