Tokyo Paralympics 2020 चे थाटात उद्घाटन, भारताच्या टेक चंदने फडकावला तिरंगा

| Updated on: Aug 24, 2021 | 6:43 PM

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा उत्साहात पार पडल्यानंतर आता. पॅरालिम्पिक्स खेळांना आजपासून सुरुवात झाली आहे. आज स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मोठ्या थाटा-माटात पार पडला.

Tokyo Paralympics 2020 चे थाटात उद्घाटन, भारताच्या टेक चंदने फडकावला तिरंगा
टेक चंद
Follow us on

Tokyo Paralympics : कोरोनाच्या संकटातही टोक्यो पॅरालिम्पिक्स (Tokyo Paralympics 2020) खेळांना सुरुवात झाली आहे. नुकताच उद्घाटन समारंभ पार पडला असून कोरोनासंबधी सर्व नियम यावेळी पाळण्यात आले आहेत. समारंभात केवळ 75 व्यक्तींनीच सादरीकरण केल्याने मैदान मोठ्या प्रमाणात मोकळेच होते. कार्यक्रमाची सुरुवात आतषबाजीने झाली. फटाके फुटताच सर्वात आधी जपानच्या खेळाडूंनी त्यांच्या देशाचा झेंडा फडकावत राष्ट्रगीत गायले.

उद्घाटन समारंभाच्या सुरुवातीला रेफ्यूजी पॅरालिम्पिक संघ मैदानावर आला. त्यानंतर हळूहळू इतर देशांचे संघही मैदानावर आले. भारताकडून शॉटपुट खेळाडू टेक चंद तिरंगा घेऊन मैदानात आला. त्याच्या मागे भारताचे अधिकारी आणि खेळाडू मिळून 8 सदस्य होते. आधी भारताकडून ध्वजवाहक म्हणून लांबउडी खेळाडू थैंगावेलु मरियप्पन (Thangavelu Mariyappan) हा दिसणार होता. पण  टोक्योला येताना मरियप्पन हा एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने टेक चंदची ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली.

मनोरंजनाचा कार्यक्रम आणि आतषबाजी

सर्व खेळाडूंनी आपआपल्या देशाचा झेंडा फडकावल्यानंतर काही मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. यावेळी मैदानात पॅरा विमानतळाची थीम तयार करण्यात आली होती. यावेळी एक व्हिडीओ दाखवण्यात आला ज्यामध्ये पॅरा एथलिट्सची ताकद आणि क्षमता दाखवण्यात आली. त्यानंतर काही कार्यक्रम झाल्यानंतर सुंदर अशी नयनरम्य आतषबाजीही यावेळी दिसून आली.

न्यूझीलंड संघाची माघार

तालिबानने अफगाणिस्तान देशावर ताबा मिळवल्याने अफगाणिस्तानच्या खेळाडूंना पॅरालिम्पिक खेळातून माघार घ्यावी लागली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितिने (आईपीसी) उद्घाटन समारंभात अफगाणिस्तानचा झेंडा फडकावत एकतेचा संदेश दिला. दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघाने टोक्योमधील कोरोनाच्या संकटामुळे स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

इतर बातम्या

Tokyo Paralympics 2020: पॅरालिम्पिक्समध्येही यश मिळवण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज, वाचा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

Tokyo Paralympics: पंतप्रधान मोदींनी पॅरालिम्पिक्ससाठी रवाना होणाऱ्या खेळाडूंशी साधला संवाद, 24 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात

(In Tokyo paralympics opening ceremony tek chand holds indian flag)