Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिक 2020 (Tokyo Olympics-2020) मध्ये पाचवा दिवस भारतासाठी काहीसा दिलासादायक ठरला. भारताला पदकाची सर्वाधिक अपेक्षा असणाऱ्या भारतीय हॉकी संघाने स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला. तर महिला बॉक्सर लवलीनानेही जर्मनीच्या बॉक्सरला नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली आता पदकापासून ती केवळ एक विजय दूर आहे. दरम्यान बुधवारी देखील भारताच्या महत्त्वच्या स्पर्धा असून पीव्ही सिंधू तसेच भारतीय महिला हॉकी संघ मैदानात उतरणार आहे.
पहिले दोन्ही सामने गमावलेला भारतीय महिला हॉकी संघ (Indian Womens Hocky Team) बुधवारी भारतीय वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता ग्रेट ब्रिटन संघासोबत पूल ए मधील सामना खेळणार आहे. पहिल्या सामन्यात नेदरलँड संघाकडून 5-1 च्या फरकाने पराभव पत्करलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यातही जर्मनी संघाकडून 2-0 ने पराभव मिळाला. त्यानंतर आता स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात विजयासाठी भारतीय महिला ग्रेट ब्रिटनशी भिडणार आहेत.
भारताला रिओ ऑलिम्पकमध्ये रौप्य पदक मिळवून देणारी पीव्ही सिंधू (PV Sindhu) यंदाच्या ऑलिम्पिकमधील दुसरा सामना खेळणार आहे. पहिल्या सामन्यात इस्त्रायलच्या केस्नियाला नमवल्यानंतर आता सिंधू तिची विजयी मालिका कायम ठेवण्यासाठी दुसरा सामना खेळणार आहे. भारतीय वेळेनुसाकर सिंधू सकाळी 7.30 वाजता हाँग काँगच्या बॅडमिंटनपटूसोबत लढणार आहे.
भारतीय वेळेनुसार 7 वाजून 31 मिनिटांनी तिरंदाजीतील पुरुष एकेरीचा पहिला सामना तरुणदीप राय (Tarundeep Rai) खेळेल. नेमबाजीत भारताचे महत्त्वाचे खेळाडू अयशस्वी ठरल्यानंचर तिरंदाजाकडून भारताला खूप अपेक्षा आहेत. तरुणदीपनंतर दुपारी 12.30 वाजता मराठमोळा प्रवीण जाधव (Pravin Jadhav) पुरुष एकेरीचा दुसरा सामना खेळेल. तर वर्ल्ड रँकिगमध्ये अव्वल असणारी तिंरदाज दीपिका कुमारी (Deepika Kumari) दुपारी 2 वाजून 14 मिनिटांनी महिला एकेरीचा सामना खेळेल.
रोविंग खेळाच्या पुरुष दुहेरी सामन्यात भारताची अरविंद सिंग (Arvind Singh) आणि अर्जून लाल (Arjun Lal) ही जोडी एकत्र खेळताना दिसणार आहे. या सामन्यात विजयासाठी दोघेबी शर्थीचे प्रयत्न करणार हे नक्की. हा सामना भारतीय वेळेनुसार 8 वाजता सुरु होईल.
रोविंगच्या सामन्यानंतर 8 वाजून 35 मिनिटांनी सेलिंगच्या स्पर्धेत भारताचे खेळाडू केसी गणपती (KC Ganapathy) आणि वरुण ठक्कर (Varun Thakkar) खेळताना दिसतील. भारताला पदक मिळवून देण्यासाठी हा देखील एक महत्त्वाचा सामना असल्याने उद्याच्या सामन्यात त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची आशा व्यक्त केली दात आहे.
सकाळी सिंधूच्या सामन्यानंतर 2.30 वाजता भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू बी. साईप्रणित (B. Sai Praneeth) पुरुष एकेरीचा सामना खेळणार आहे. पुरुष दुहेरी सामन्यात पराभूत झालेला साईप्रणित पुरुष एकेरीत विजयासाठी जीवाचे रान करेल हे नक्की!
भारतासाठी दिवसाचा शेवटचा सामना 2.33 वाजता होणार असून हा बॉक्सींगचा सामना असेल. भारताची महिला बॉक्सर पुजा राणी (Pooja Rani) रिंगमध्ये उतरणार आहे. आधी मेरी कोम आणि आज लवलिनाने महिला बॉक्सींगमध्ये उत्तम कामगिरी केल्याने तशीच कामगिरी पुजाकडूनही अपेक्षित असेल.
हे ही वाचा
Tokyo Olympics 2021: भारताची बॉक्सर लवलीना पदकापासून एक पाऊल दूर, उपांत्यपूर्व फेरीत दाखल
(India schedule in olympics for day 6 PV sindhu and womens hocky team will play match)