Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics-2020) भारतासाठी पुरुष एकेरीत खेळणारा महाराष्ट्राचा सुपुत्र तिरंदाज प्रवीण जाधव (Pravin Jadhav) याने आज चांगली सुरुवात करत पहिला सामना 6-0 च्या फरकाने जिंकला. त्याने जगातील नंबर 2 चा खेळाडू असणाऱ्या आरओसी संघाच्या गालसन बाजारझापोव याला मात देत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. त्यानंतर दुसऱ्या फेरीत मात्र जगातील नंबर एकचा तिरंदाज असणाऱ्या अमेरिकेच्या एलिसन ब्राडीने जाधवला नमवत स्पर्धेबाहेर केलं.
पहिल्या सेटपासूनच ब्राडीने सामन्यात दबदबा कायम ठेवला होता. पहिल्या सेटमध्ये ब्राडीने 28 गुण मिळवले. तर जाधव 27 गुण मिळवल्याने पिछाडीवर पडला. ज्यामुळे सामन्यात ब्राडीने 2-0 ची आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये ब्राडीने 27 गुण मिळवले तर जाधव 26 गुणच मिळवू शकला. त्यानंतर अखेरच्या निर्णायक सेटमध्ये ब्राडीने 26 आणि जाधवने 23 गुण मिळवल्याने अखेर सामन्यात जाधव 6-0 ने पराभूत झाला. या पराभावासह जाधवची यंदाच्या ऑलिम्पिकमधील यात्राही संपली आहे.
#Archery
Men’s Individual 1/16 Eliminations ResultsIndia’s India’s Pravin Jadhav goes down against World No. 1 Brady Ellison 0-6. #Cheer4India #Tokyo2020 #Olympics pic.twitter.com/3nyVRWywOG
— Doordarshan Sports (@ddsportschannel) July 28, 2021
प्रवीणचा आतापर्यंतचा प्रवास नक्कीच सर्वांसाठी एक उत्कृष्ठ उदाहरण आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून आलेल्या प्रवीणने मेहनतीच्या जोरावर ऑलिम्पकमध्ये पात्रता मिळवली. ऑलिम्पकसाठी येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी प्रवीणला शुभेच्छा देताना त्याच्या प्रवासाबद्दल विचारलं होतं. तेव्हा प्रवीण आधी अॅथलिटिक्स करायचा असा खुलासा त्याने केला होता. त्याचं सुरुवातीला राज्य पातळीवर अॅथलिटिक्स स्पर्धेसाठी सिलेक्शन झालं होतं. पण त्याची प्रकृती अॅथलिटिक्ससाठी योग्य नसल्याने त्याला त्याच्या प्रशिक्षकाने वेगळा कोणतातरी खेळ खेळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर प्रवीणने तिरंदाजीचा सराव सुरु केला.
हे ही वाचा
Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचं पदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल, दुसरा सामना जिंकत बाद फेरीत दाखल
(Indian archer pravin Jadhav lost second match and out of tokyo Olympics)