Tokyo Olympics 2021: शानदार! अवघ्या 28 मिनिटात सिंधू विजयी, सलामीच्या सामन्यात विजयाने सुरुवात

| Updated on: Jul 25, 2021 | 10:25 AM

भारताला ऑलिम्पिक खेळांमध्ये रौप्य पदक जिंकवून देणारी महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने टोक्यो ऑलिम्पिकची देखील शानदार सुरुवात करत पहिल्याच सामन्यात विजयाने स्पर्धेचा श्रीगणेशा केला आहे.

Tokyo Olympics 2021: शानदार! अवघ्या 28 मिनिटात सिंधू विजयी, सलामीच्या सामन्यात विजयाने सुरुवात
पी व्ही सिंधू
Follow us on

Tokyo Olympics 20-2021 : भारताची स्टार महिला बॅडमिंटन (Badminton) खेळाडू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) टोक्यो ऑलिम्पिकची सुरुवातच विजयाने केल्यामुळे तिच्या पदक जिंकण्याच्या आशा आणखी पल्ल्वीत झाल्या आहेत. ग्रुप J मध्ये सिंधूने महिला एकेरीमध्ये इस्रायलच्या खेळाडूला मात दिली. सिंधूने हा सामना 21-7, 21-10 च्या फरकाने सहज जिंकत विजय मिळवला. सिंधू आता महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पोहोचली आहे.

सिंधूने सामन्यात सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी केस्नीया पोलिकारपोवा हिच्यावर दबाव ठेवून होती.  तिने सुरुवातीला काही पॉईंट्स नावे केले, ज्यानंतर केस्नीयाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधीच न देता सामना जिंकला. सिंधू अगदी तुफान फॉर्ममध्ये दिसून येत होती. विशेष म्हणजे हा सामनार अर्धा तासही चालला नाही. सिंधूने अवघ्या 28 मिनिटांत सामना जिंकला.

पदकाच्या आशा पल्लवीत

स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात अप्रतिम विजय मिळवत 26 वर्षीय सिंधूने भारताला यंदाही 2016 प्रमाणे पदक जिंकवण्याच्या शक्यतांना अधिक दाट केलं आहे. स्पर्धेत एक चांगली सुरुवात झाल्याने सिंधू आता आत्मविश्वासाने खेळेल ज्यामुळे ती यंदा पदक नक्कीच खिशात घालेल अशी आशा सर्वच व्यक्त करत आहेत. पहिला गेम ज्याप्रमाणे ती निडर होऊन खेळली तशीच पुढील स्पर्धा खेळल्यास तिला नक्कीच फायदा होईल असे मत ही व्यक्त केले जात आहे.

हे ही वाचा :

रिओमध्ये हुलकावणी, डिप्रेशनने गाठलं, मात्र टोकियोमध्ये कमाल केली, मीराबाईच्या रौप्य विजयाच्या 10 खास गोष्टी

Tokyo Olympics 2021 : मीराबाई चानूने रचला इतिहास, वेटलिफ्टिंगमध्ये भारताला टोक्‍यो ऑलिम्पिकमधील पहिलं पदक

(Indian Badminton star Pv sindhu wins her first match in Tokyo Olympic 2021)