Tokyo Olympics 20-2021 : भारताची आघाडीची बॉक्सर मेरी कोमने (Mary Kom) टोक्यो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics) सलामीच्या सामन्यात शानदार विजय मिळवत स्पर्धेची सुरुवात केली आहे. राउंड ऑफ 32 च्या सामन्यात 6 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेली डॉमिनिक रिपब्लिकची महिला बॉक्सर मिग्यूलिना (Miguelina Hernandez) हिला नमवत मेरीने आपला पहिला विजय मिळवला आहे. मेरीने महिलांच्या 51 किलोग्राम वजनी गटात हा सामना 4-1 च्या फरकाने जिंकला आहे.
मेरीने सामन्याची सुरुवातच एका विशिष्ट रणनीतीने केली. आपल्या दांडग्या अनुभवाच्या मदतीने मेरीने सर्व सामना खेळला. सुरुवातीपासून बचावात्मक खेळ करत मेरीने सामन्यात वर्चस्व कायम ठेवले. 3 राउंडच्या सामन्यात मेरीने पहिला राउंडमध्ये अगदी धीमा खेळ केला. या राउंडमध्ये आपली एनर्जी वाचवून मेरीने राउंड पूर्ण केला.
दुसऱ्या राउंडमध्ये मेरी कोमने आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. मात्र प्रतिस्पर्धी खेळाडूने देखील आक्रमक खेळ करत सामन्यात चुरशीची टक्कर दिली. दुसरा राउंड समाप्त होताना दोघींचा स्कोर समान होता. कारण 2 परीक्षकांनी मेरीला 10-10 तर दोन परीक्षकांनी हेरनांडिजला 10-10 गुण दिले होते.
दुसरा राउंड बरोबरीत सुटल्यानंतर तिसऱ्या राउंडमध्ये मेरीने पूर्ण ताकद लावत सामन्यात वर्चस्व प्रस्थापित केलं. मेरीने आक्रमक बॉक्सिंगचं प्रदर्शन करत राउंडमध्ये अप्रतिम विजय मिळवला आणि अखेर 4-1 अशा दमदार फरकाने सामनाही आपल्या नावे केला. या विजयामुले मेरीचा पदकाच्या दिशेकडील प्रवास आणखी सुकर झाला आहे.
#TeamIndia | #Tokyo2020 | #Boxing
Women’s Fly Weight 48-51kg Round of 32 Results@MangteC के पंच में है दम। Mary kick starts her #Olympics campaign on a strong note, dominating Garcia Hernandez. What a power packed bout by our champ #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/4kE6vfspd2— Team India (@WeAreTeamIndia) July 25, 2021
हे ही वाचा :
Tokyo Olympics 2021: शानदार! अवघ्या 28 मिनिटात सिंधू विजयी, सलामीच्या सामन्यात विजयाने सुरुवात
(Indian Boxer Mary Kom Won first match in 51 kg category at Tokyo Olympics)