भारताचा टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तिसरा दिवस निराशाजनक ठरला
Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics) तिसऱ्या दिवशीचे खेळ संपले असून संपूर्ण दिवसभरात भारतीय खेळाडूंना खास कामगिरी करता आली नाही. रविवारच्या (25 जुलै) संपूर्ण दिवसात भारतीय खेळाडूंनी़ अनेक खेळांमध्ये सहभाग घेतला. ज्यातील काही सामने सोडता अधिक खेळांत भारताच्या हाती निराशाच आली. निशानेबाजीच्या दोन स्पर्धांमध्ये भारताला पदक जिंकण्याची संधी होती पण त्यामध्ये भारतीय निशानेबाद अयशस्वी ठरले. निशानेबाजीसह टेनिस, बॉक्सिंग आणि हॉकी खेळांमध्येही भारताच्या पदरी निराशाच आली. केवळ बॉक्सर मेरी कोमने (Mary Kom) आणि पीव्ही सिंधू (PV Sindhu) या दिग्गजांनी विजयाने स्पर्धेची सुरुवात केली हाच काय तो आज मिळालेला दिलासा…
तिसऱ्या दिवशीच्या 10 विविध खेळांमधील वेगवेगळ्या भारतीय खेळाडूंची कामगिरी –
बॉक्सिंग
- सहा वेळा विश्व चॅम्पियन आणि लंडन ओलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेती भारताची दिग्गज बॉक्सर मेरी कॉमने 51 किलोग्राम वर्गात पहिल्याच सामन्यात डोमिनिका रिपब्लिकच्या मिग्यूलिना हेरनांडिज हीला 4-1 ने मात दिली.
- पुरुषांमध्ये मात्र 63 किलोग्राम वर्गात कुस्तीपट मनीष कौशिकला ग्रेट ब्रिटेनच्या बॉक्सरने 4-1 ने मात देत पराभव चाखायला लावला.
टेबल टेनिस
- महिला एकेरीमध्ये मनिका बत्राने अप्रतिम प्रदर्शन दाखवत विजय मिळवला. दुसऱ्या राउंडमध्ये युक्रेनच्या खेळाडूला मात सामना जिंकला. आधी 0-2 ने पिछाडीवर असणाऱ्या मनिकाने अखेरच्या वेळेत तुफानी खेळी करत 4-3 ने विजय मिळवला.
- तर पुरुष एकेरीमध्ये दुसऱ्या राउंडमध्ये पोहोचलेल्या जी साथियनला 7 फेऱ्या चाललेल्या सामन्यात अखेर हार पत्करावी लागली. हाँगकाँगच्या खेळाडूने त्याला पराभूत केलं.
बॅडमिंटन
महिला एकेरीमध्ये भारताची स्टार खेळाडू पीव्ही सिंधूने अवघ्या 28 मिनिटाच इस्त्राईलच्या सेनियाला मात देत विजय मिळवला. सिंधूने 21-7,21-10 च्या फरकाने सामना जिंकला.
रोइंग
अरविंद सिंग आणि अर्जुन लाल यांनी लाइटवेट पुरुष दुहेरीमध्ये स्कल के रेपेचेज राउंड मध्ये 6:51:36 च्या टायमिंगने तिसरे स्थान पटकावत सेमीफायनलसाठी पात्रता मिळवली.
निशानेबाजी
- महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये भारताच्या दोन युवा निशानेबाज मनु भाकर आणि यशस्विनी देसवाल पात्रता फेरीतच बाहेर गेल्या. भाकरची पिस्टल खराब झाल्याने तिला हा पराभव पत्करावा लागला.
- पुरुषांमध्ये 10 मीटर एअर रायफलमध्ये दीपक कुमार आणि दिव्यांश पवार हे दोघेही फायनलमध्ये जागा बनवू शकले नाहीत. दीपक 624.7 गुणांसह 26 व्या तर दिव्यांश 622.8 गुणांसह 32 व्या स्थानावर राहिला.
- तसेच पुरुषांच्या स्कीट राउंडमध्ये क्वॉलिफिकेशनआधी पहिल्या दिवशी तीन राउंड खेळले गेले. ज्यात भारताच्या अंगद बाजवा 73/75 गुणांनी 11 व्या स्थानावर होता. तर मेराज खान 71/75 गुणांसह 25 व्या स्थानावर होता. सोमवारी 26 जुलैला चौथा आणि पाचवा राउंड खेळवला जाईल.
टेनिस
सानिया मिर्झा आणि अंकिता रैना यांची जोड़ी पहिल्या राउंडमध्येच स्पर्धेबाहेर गेली. यूक्रेनच्या टेनिसपटूंविरुद्ध 6-0 ने पहिला सेट भारताने जिंकला. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये युक्रेनने 7-6 आणि 8-10 च्या फरकाने विजय मिळवला.
सेलिंग
- महिला एकेरीमध्ये नेत्रा कुमारन पहल्या रेसमध्ये 33 व्या तर दुसऱ्या रेसमध्ये 16 व्या अंकावर राहिली. या स्पर्धेत 8 अजून रेस बाकी आहेत.
- तर पुरुषांमध्ये सरवनन विष्णुने 10 पैकी झालेल्या एका रेसमध्ये 14वा रँक मिळवला. स्पर्धेतील आणखी 9 रेस होणार आहेत.
जिम्नॅस्टिक
आर्टिस्टिक जिमनास्ट प्रणति नायक ऑल राउंड फायनल्ससाठी क्वॉलिफाय करु शकली नाही. चारी कॅटेगरीमध्ये मिळून ती 42.565 इतकेच गुण मिळवू शकली.
पोहणे
- पोहण्याच्या स्पर्धेत भारताकडून माना पटेल ही महिला वर्गात 100 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत तिच्या हीटमध्ये दुसऱ्या स्थानावर होती. मात्र सेमीफायनलमध्ये पात्रता मिळवण्यापासून ती थोडक्यात चूकली.
- तर पुरुषांमध्ये श्रीहरि नटराजने 100 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत तिसऱ्या हीटमध्ये 54.31 सेकंद वेळ घेत सहावं स्थान मिळवलं ज्यामुळे तो 27 व्या स्थानावर राहिला आणि त्यामुळे स्पर्धेत यश मिळवू शकला नाही.
हॉकी
भारतीय पुरुष हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पक्समध्ये पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड संघाला नमवत विजयी सुरुवात केली होती. मात्र दुसऱ्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभव पत्करावा लागला. हा पराभवही साधा नसून तब्बल 7-1 च्या फरकाने पत्करावा लागल्याने भारतीय हॉकी चाहते निराश झाले.
हे ही वाचा
Tokyo Olympics 2021: भारतीय पुरुष हॉकी संघाचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाने 7-1 ने चारली धुळ
Tokyo Olympics 2021: मेरी कोमचा विजयी ‘Punch’, ऑलिम्पिकच्या पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय
(Indian Game in Tokyo olympics day 3 Mary kom PV sindhu Won Hocky team defeated)