Tokyo Olympic 2021 : यंदा भारताला पदकाची सर्वाधिक आशा असणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनी संघाला 5-4 ने नमवत (India vs Germany) कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. या विजयानंतर संपूर्ण देशातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे. यावेळीच कर्णधार मनप्रीत सिंगने (Manpreet singh) आणखी एक वाखाणण्याजोगी कृती करत हे पदक कोविड योद्ध्यांना (Covid Warriors) समर्पित केल्याची प्रतिक्रिया केली. आनंदाच्या, जल्लोषाच्या वातावरणातही संवदेनशीलता जपत सिंगने ही प्रतिक्रिया दिली.
एकेकाळी ऑलिम्पिक खेळांच्या हॉकी स्पर्धांवर भारतीय पुरुषांचे एकहाती वर्चस्व होते. सलग काही वर्षे सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारतीय संघाला 1980 नंतर मात्र एकही पदक पटकावता आले नाही. सेमीफायनलपर्यंत देखील धडक न मारता आल्याने हॉकी संघ गेल्या 41 वर्षांपासून पदकाची वाट पाहत होता. पण यंदा भारतीय संघाने स्पर्धेच्या सुरुवातीपासून अप्रतिम कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये थोडक्यात पराभव झालेल्या भारतीयांनी तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात कोणतीच चूक न करता जर्मनीला नमवत कांस्य पदक जिंकलं.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विजयानंतर भारतीय हॉकी संघातील खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक यांच्याशी बातचित केली. यावेळी त्यांनी कर्णधार मनप्रीतचं विशेष कौैतुक करत ‘तू इतिहास लिहिलास’ अशा शब्दात त्याचं कौतुक केलं. तसेच बेल्जियमविरुद्ध पराभवानंतर शांत झालेला मनप्रीत आज मात्र जोशपूर्ण दिसून आला असंही मोदी यांनी नमूद केलं. त्यांनी इतर खेळाडूंशी देखील बातचीत करत त्यांचही अभिनंदन केलं.
हे ही वाचा :
Tokyo Olympic 2021 : ‘तू इतिहास लिहिलासं’, भारतीय हॉकी संघाच्या कर्णधाराचं पंतप्रधानांकडून कौतुक
(Indian Hockey team captain manpreet singh dedicates bronze medal to covid warriors)