कोची : भारतीय पुरुष हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. सेमीफायनलमध्ये पराभवानंतरही पुन्हा जोमाने उठत तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत जर्मनीला 5-4 ने मात देत कांस्य पदकावर नाव कोरले. या विजयानंतर भारतीयांमध्ये एक वेगळाच आनंद दिसत होता. देशाचा राष्ट्रीय खेळ असल्याने हा विजय सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा अनमोल विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूंवरही कौतुकांचा वर्षाव होत असतानाच संघातील खेळाडूंना त्यांच्या राज्य सरकारनेही बक्षिसं जाहीर केली.
आधी पंजाब सरकारने त्यांच्या संघातील सर्व खेळाडूंना 1 कोटी रुपयांचं रोख बक्षिस जाहीर केलं. त्यानंतर ओडीसा सरकारने ही त्यांच्या संघातील दोन खेळाडूंना प्रत्येकी 2.50 कोटींचे बक्षिस दिले. दरम्यान संघाला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा असणाऱ्या गोलकिपर पी आर श्रीजेश (pr sreejesh) याला मात्र त्याच्या केरळ राज्याकडून एक धोतर, शर्ट आणि एक हजार रुपये असं बक्षिस देणार असल्याची बातमी समोर आली होती. यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर आता मात्र केरळ सरकारने श्रीजेशला दोन कोटी रुपयांचं बक्षिस जाहीर केलं आहे. तसेच श्रीजेशला बढती देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. श्रीजेश सध्या सार्वजनिक शिक्षण विभागामध्ये उपनिर्देशक म्हणून कार्यरत होता. आता त्याला बढती देऊन सहाय्यक निर्देशक करण्यात येणार आहे.
Kerala Govt announces a reward of Rs 2 crores for PR Sreejesh, the goalkeeper of Indian men’s hockey team that won a bronze medal at Tokyo Olympics
Sreejesh, who is Deputy Director (Sports) in Public Education Department, will be promoted to the post of Joint Director (Sports) pic.twitter.com/BEm4M2s9dw
— ANI (@ANI) August 11, 2021
संपूर्ण टोक्यो ओलिम्पिकमध्ये श्रीजेशने अनेक गोल अडवले आहेत. गोलकीपर पीआर श्रीजेशने क्वॉर्टर फायनलच्या सामन्यात ब्रिटेन विरुद्ध केलेल्या शानदार गोलकिंपिंगमुळे तो सामना जिंकण्यात भारताला यश आलं. आज जर्मनी विरुद्ध देखील त्याने तब्बल 9 शानदार सेव्ह केल्या. कांस्य पदकासाठीच्या भारत आणि जर्मनी यांच्यातील सामन्या दरम्यानही शेवटच्या मिनिटांत जर्मनीला एक पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. जर्मनीने हा गोल करताच त्यांनी सामन्यात बरोबरी साधली असती. पण याच वेळी श्रीजेशने अप्रतिम सेव्ह करत भारताचा विजय पक्का केला.
हे ही वाचा :
Tokyo Olympic 2021 : ‘तू इतिहास लिहिलासं’, भारतीय हॉकी संघाच्या कर्णधाराचं पंतप्रधानांकडून कौतुक
(Indian Hockey team goalkeeper pr sreejesh Got reward of 2 crores from keral government)