Tokyo Olympic 2021 : टोक्योतील एस्ट्रो टर्फवर भारताने इतिहास रचत 41 वर्षानंतर हॉकीमध्ये पदक जिंकलं. या एका पदकाने कोट्यवधी भारतीयांना आनंद दिला आहे. हा आनंद मिळवून देणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघातील (Indian Men’s Hockey Team) सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट खेळी केली. पण संघातील 9 धुरंदर फॉरवर्ड खेळाडूंनी दागलेले 23 गोल भारतीय प्रेक्षक कधीच विसरु शकत नाही. 1980 च्या मास्को ओलिम्पिकनंतर भारताने पहिल्यांदाच हॉकीमध्ये पदक मिळवलं आहे.
संपूर्ण टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने केलेल 23 गोलच विजय मिळवून देण्यात महत्त्वाचे ठरले. या 23 गोलमधील 13 गोल ग्रुप स्टेजमधील 5 सामन्यात ठोकले. त्याच्या जोरावरच 5 पैकी 4 सामने भारत जिंकला. ज्यानंतर नॉकआउट स्टेजमध्ये भारताने 10 गोल केले. भारताकडून हरमनप्रीत सिंगने सर्वाधिक गोल दागले.
टोक्यो ओलिम्पिकमध्ये भारताकडून गोल करण्यात सर्वात मोठं योगदान दिलं ते हरमनप्रीत सिंगने. त्याने संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक गोल केले. संघाने केलेल्या 23 गोलमधील अर्धा डजन गोल एकट्या हरमनप्रीतने केले. त्याने स्पर्धेत तब्बल 6 गोल केले. हरमनप्रीत पाठोपाठ रूपिंदर पाल सिंगने ज्याला भारताचा ड्रॅग फ्लिक स्पेशलिस्ट म्हटलं जात, त्यानेही स्पर्धेत 4 गोल केले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सिमरनजीत असून त्याने स्पर्धेत 3 गोल केले. त्यानंतर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर दिलप्रीत, हार्दिक आणि गुरजंत हे तिघे असून त्यांनी प्रत्येकी 2-2 गोल करत संघाला योगदान दिलं. यांच्याशिवाय कर्णधार मनप्रीत सिंग, विवेक प्रसाद आणि वरूण कुमारनेही 1-1 केला.
हे ही वाचा :
Tokyo Olympic 2021 : ‘तू इतिहास लिहिलासं’, भारतीय हॉकी संघाच्या कर्णधाराचं पंतप्रधानांकडून कौतुक
(Indian Hockey team won bronze after scoring 23 goals in tokyo Olympic)