Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकच्या (Tokyo Olympics-2020) सहाव्या दिवसाचे सर्व सामने संपले असून आजचा दिवस भारतासाठी आशादायी ठरला. काही पराभव सोडले तर भारताच्या वंडर वुमन्सनी उत्तम कामगिरी करत पदकाच्या दिशेने आगेकूच केली. यामध्ये बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, बॉक्सर पुजा रानी आणि तिरंदाज दीपिका कुमारी यांच्या विजयाचा समावेश असून महिला हॉकी संघाला मात्र सलग तिसऱ्या पराभावाला सामोरं जावं लागलं तर नेमका आजचा दिवस कसा होता याचा सविस्तर लेखाजोखा –
आजच्या दिवसाची सुरुवातच पराभवाने झाली. भारतीय महिला हॉकी संघाला स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यातही पराभवच पत्करावा लागला. पहिल्या सामन्यात नेदरलँडने 1-5 ने मात दिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात जर्मनीने 2-0 ने नमवल्यानंतर आजच्या तिसऱ्या सामन्यात ग्रेट ब्रिटेनकडूनही 4-1 ने भारतीय महिलांना पराभव पत्करावा लागला.
पीव्ही सिंधूने स्पर्धेतील दुसऱ्या विजयासह बाद फेरीत धडक घेतली आहे. तिने हाँग काँगच्या चीयूंगा नगनला मात दिली. सिंधूने 21-9, 21-16 अशा सरळ दोन सेट्समध्ये सामना जिंकला. केवळ 35 मिनिटात सामना संपवत सिंधूने स्पर्धेत दुसरा विजय मिळवला. याआधी इस्त्रायलच्या पोलिकारपोवा कसेनियाला 21-7, 21-10 अशा फरकाने सिंधूने मात दिली होती. पुरुष एकेरीत मात्र ग्रुप-डीच्या सामन्यात भारताच्या बी. साई. प्रणीतला नेदरलँड्च्या मार्क काउलजोवने 21-14, 21-14 च्या फरकाने नमवला.
तिरंदाजीमध्ये पुरुष ऐकरी स्पर्धेत भारताचा तरुणदीप रॉयने पहिल्या सामन्यात यूक्रेनच्या ओलेक्सी हनबिनला 6-4 ने मात दिली. पण दुसऱ्या सामन्यात इटलीच्या इताय शौनीने तरुणदीपला 6-5 ने पराभूत करत स्पर्धेबाहेर केलं. दुसरीकडे महाराष्ट्राचा सुपुत्र प्रवीण जाधवलाही पहिल्या सामन्यात आरओसीच्या गालसन बाजारझापोवला 6-0 ने नमवण्यात यश आलं. पण दुसऱ्या सामन्यात अमेरिकेच्या एलिसन ब्राडीने प्रवीणला 6-0 ने नमवलं.
दुसरीकडे महिलांमध्ये दीपिका कुमारीने पहिल्या सामन्यार कर्माला 6-0 ने आणि दुसऱ्या सामन्यात अमेरिकेच्या जेनिफर फर्नांडेजला 6-4 ने मात देत पुढील फेरी गाठली.
भारताची महिला बॉक्सर पूजा रानीने 75 किलोग्राम वर्गात अल्जीरियाच्या चाईब हिला नमवत राउंड-16 मधून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. तिने हा सामना 5-0 जिंकला. पूजा आणि लवलीना या दोन्ही भारतीय महिला बॉक्सर उपांत्यपूर्व फेरीत पोहचल्या आहेत. त्यामुळे आता दोघींही आपआपल्या गटात अंतिम 8 मध्ये गेल्याने त्यांना पदकासाठी केवळ एक सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. कारण उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्य़ा चारही खेळाडूंना किमान कांस्य पदक दिले जाते असा नियमच बॉक्सिंगमध्ये आहे.
हे ही वाचा
Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचं पदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल, दुसरा सामना जिंकत बाद फेरीत दाखल
(Indian players todays 6th days Olympic performance satisfactory pooja rani pv sindhu deepika kumari Won matches)