Tokyo Paralympics 2020: भारताचा नेमबाज सिंगराज अधाना (Singhraj Adhana) यानं टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympic 2020) कांस्यपदकावर नाव कोरलं आहे. सिंगराजने मिळवलेलं हे पदक भारताच्या खात्यातील आठवं पदक आहे. हरियाणाचा नेमबाज असणाऱ्या सिंगराजने टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेतील नेमबाजी 10 मीटर एअर पिस्तुल एसएच1 गटाच्या अंतिम फेरीत सिंगराजनं हे यश मिळवलं. सिंगराजनं 216.8 गुणांसह हे कांस्यपदक मिळवलं आहे. दरम्यान या पदकाच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी त्याच्या पत्नीचा मोठा हात आहे.
सिंगराज एक सामान्य शेतकरी कुटुंबातून आहे. सिंगराजने अगदी अलीकडे नेमबाजीचा सराव करण्यास सुरुवात केली. बऱ्याच वेळाने नेमबाजीचा सराव सुरु केल्यानंतरही सिंगराजला विश्वास होता तो नक्कीच यात काहीतरी करुन दाखवेल. त्याप्रमाणेच त्याने त्याच्या आणि पॅरालिम्पिक पदकाच्यामध्ये वय किंवा आजार कधीच मध्ये येऊ दिला नाही. अखेर त्याने आज कांस्य पदकावर नाव कोरल्यावर त्याच्या या यशात पत्नीचा असणारा सहभागही समोर आला आहे.
सिंगराजची हरियाणाच्या बहादुगड येथील रहिवासी आहे. घरची परिस्थिती सामान्य असल्याने सिंगराजसाठी नेमबाजी सारखा महागडा खेळ खेळणं अवघड होतं. सिंगराजने पॅरालिम्पिकपूर्वी पंतप्रधान मोंदीशी (PM Modi) केलेल्या बातचीतीदरम्यान त्याच्या पत्नीने केलेल्या त्यागाबद्दल सांगितले होते. तो म्हणाला होता, ‘पहिलं राष्ट्रीय पदक जिंकल्यानंतरच मी पॅरालिम्पिक पदक जिंकण्याचं ठरवलं होतं. मला यासाठी एक चांगलं पिस्टल इतर उपकरण हवी होती. माझ्या प्रशिक्षकाने मला सांगितल्याप्रमाणे यासाठी दिवसाला 7 ते 8 हजार रुपयांचा खर्च येणार होता. त्यावेळी माझ्या पत्नीने माझ्या स्वप्नांसाठी तिचे दागिने विकले होते.’
भारताने आतापर्यंत 7 पदकं मिळवली आहेत. ज्यामध्ये दोन सुवर्णपदकांसह चार रौप्य आणि एक कांस्य पदकांचा समावेश आहे. आता सिंगराजच्या या विजयामुळे भारताकडे एक कांस्य पदक आणखी आलं आहे. ज्यामुळे भारताच्या खात्यात एकूण 8 पदकं झाली आहेत.
हे ही वाचा
Tokyo Paralympics मध्ये भारताची सुवर्ण भालाफेक, सुमित अंतिलने जिंकलं सुवर्णपदक, दिवसभरातील पाचवं पदक
Tokyo Paralympics मध्ये भारताला मोठा झटका, विनोद कुमारला कांस्य पदक परत करण्याची वेळ
(Indian Shooter singhraj adhana wife sold jewellery for singhraj Shooting game)