नवी दिल्ली : अवघ्या 5 वर्षाची असताना अनाथ झालेली रेवती वीरामनी (Revathi Veeramani) हिला मजदूर म्हणून काम करणाऱ्या आजीने सांभाळलं. सुरुवातीला सराव करताना पायात शूजतर सोडा चप्पलही नसायचं आणि अशा कठीण परिस्थितीवर मात करत रेवती आता भारताकडून जगातील सर्वांत महान स्पर्धा असणाऱ्या ऑलम्पिकमध्ये खेळणार आहे. तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातील सकीमंगलम या गावातील 23 वर्षीय रेवती 23 जुलैपासून सुरु होणाऱ्या टोक्यो ऑलम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2021) भारताचे प्रतिनिधित्त्व करणार आहे. रेवती भारताच्या चार गुणा 400 मीटर मिश्रित रिले टीममध्ये आहे. (Indian Sprinter Revathi Veeramani Orphaned at age of 5 Now Playing For India in Tokyo Olympic 2020)
रेवतीने ज्या कठीण परिस्थितीचा सामना केला आहे त्याबद्दल पीटीआयशी बोलताना तिने सांगितले की,”मला सांगण्यात आलं होतं की माझ्या वडिलांना पोटाचा काहीतरी त्रास असल्याने त्यांचे निधन झाले आणि सहा महिन्यानंतर तापामुळे आईचेही निधन झाले. त्यानंतर मला आणि बहिणीला माझी आज्जी अराम्मल हिने सांभाळलं. तिला त्यासाठी वीटभट्टीवर मजूरी करावी लागत. तिला नातेवाईकांनी आम्हाला शाळेला पाठवू नको असे सांगितल्यावरही तिने कोणाचेही न ऐकता आम्हाला शिकवले.’’ रेवती आणि तिच्या बहिणीला 76 वर्षीय आजीने शिकवल्यामुळे त्या दोघीही आपल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करु शकल्या. आता ऑलम्पिक खेळण्यासाठी जाणारी रेवती भारतीय रेल्वेमध्ये टीटीईची नोकरी देखील करते. तर तिची छोटी बहिन चेन्नई पोलिसांत अधिकारी आहे.
रेवतीने कॉलेजमध्ये सराव करतानाच्या आठवणींबद्दल सांगितले की, ‘माझ्या आजीने खूप मेहनत करुन आम्हाला सांभाळले. तसेच माझे गुरुजी कन्नन सर यांनी खेळामध्ये माझे करीयर करण्यास मदत केली. मी कॉलेजच्या स्पर्धांमध्ये विनाचप्पल भाग घेतला होता. तसेच 2016 च्या कोयंबत्तूर राष्ट्रीय ज्यूनियर चॅम्पियनशिपमध्येही माझ्याकजडे शूज नव्हते. त्यानंतर कन्नन सरांनी मला मदत करुन योग्य त्या सोयीसुविधा पुरवल्या ज्यामुळे मी माझ्या खेळांत आणखी यशस्वी होऊ शकले.
हे ही वाचा :
Tokyo Olympics 2020 : 40 वर्षांची प्रतिक्षा संपणार, यावेळी भारतीय हॉकी टीम ‘GOLD’ मिळवणारच!
Tokyo Olympics साठी भारतीय बॉक्सर सज्ज, ‘या’ खेळाडूंकडून पदक मिळवण्याची सर्वाधिक आशा
(Indian Sprinter Revathi Veeramani Orphaned at age of 5 Now Playing For India in Tokyo Olympic 2020)