Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) टेनिस कोर्टवर अजून एका पराभवाला भारताला सामोरं जावं लागलं आहे. भारताला टेनिस स्पर्धेतील हा सलग दुसरा झटका असून यामुळे भारताचे यंदाच्या ऑलिम्पिकमधील टेनिस खेळातील आव्हानही संपुष्टात आले आहे. भारताचा टेनिसपटू सुमित नागल (Sumit Nagal) याला रशियाच्या डॅनियल मेदवेदेवने (Daniil Medvedev) दुसऱ्या फेरीत नमवत स्पर्धेबाहेर केले आहे.
पुरुष एकेरीच्या स्पर्धेत सुमित नागलच्या पराभवामुळे भारताची टेनिसमध्ये पदक विजयाची यंदाची शेवटची आशाही संपली आहे. आधी महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि अंकिता रैनाची जोडी पराभूत झाली होती. आता सुमितही पराभूत झाला आहे. मात्र पराभवानंतरही सुमितने एक खास कामगिरी केली. सुमित 25 वर्षानंतर म्हणजेच 1996 मध्ये लिएंडर पेसनंतर ऑलिम्पिकमध्ये टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीपर्यंत पोहचणारा पहिला खेळाडू ठरला.
.@nagalsumit bows out of #Tokyo2020, going down 2-6, 1-6 to World No. 2 Daniil Medvedev. ? #IND
?This #Olympics, he became the first Indian men’s #Tennis player since Leander Paes, to make it to Round 2 of the Games! ?#StrongerTogether | #UnitedByEmotion
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) July 26, 2021
दुसऱ्या फेरीतील या सामन्यात मेदवेदेवने पहिला सेट 6-2 ने जिंकून सामन्यात आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा सेटही 6-1 ने जिंकत मेदवेदेने भारताच्या सुमितवर सहज विजय मिळवला. सुमित या सामन्यात पराभूत झाला तरी त्याने अतिशय चिवट झुंज दिली. रशियाचा डॅनियल मेदवेदेव यंदा पुरुष एकेरीमध्ये सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असून त्याला सुमितने दिलेली झुंज वाखाणण्याजोगी होती.
हे ही वाचा
भारताला मिळालं सुवर्णपदक, कुस्तीपटू प्रिया मलिकचं वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये यश
(Indian Tennis Player sumit nagal lost in mens tennis single by russias daniil medvedev)