Tokyo Olympics 20-2021 : बहुप्रतिक्षित टोक्यो ऑलिम्पिकचा (Tokyo Olympic) आज दुसराच दिवस असून भारताने आपलं पहिलं पदक ही पटकावलं आहे. भारतातील मणिपूरची रहिवाशी असणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानूने (Mirabai Chanu) वेटलिफ्टिंगमध्ये दुसरा क्रमांक पटकावत भारताला रौप्य पदक (India won Silver at tokyo) मिळवून दिलं आहे. दरम्यान मीराबाईने पदक पटकावताच तिच्या घरच्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्याजोगे होते. ANI वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये चानूच्या घरातले आणि शेजारची मंडळी ती जिंकल्यानंतर जल्लोष करताना दिसत आहेत.
#WATCH | Manipur: Family and neighbours of weightlifter Mirabai Chanu burst into celebrations as they watch her win the #Silver medal for India in Women’s 49kg category. #OlympicGames pic.twitter.com/F2CjdwpPDc
— ANI (@ANI) July 24, 2021
मीराबाई चानूने ही कमाल 49 किलोग्राम महिला वर्गात केली आहे. तिने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क राउंडमध्ये मिळून तब्बल 202 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावलं आहे. मीराबाईने स्नॅच राउंडमध्ये 87 किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलत हे यश मिळवलं. तर 49 किलोग्राम वर्गात चीनच्या जजिहु हिने सुवर्ण पदक पटकावलं आहे.
मीराबाई चानूने हे रौप्य पदक पटकावत ऑलिम्पिक्स खेळात महिला वेटलिफ्टिंगमध्ये भारताला इतिहासातील दुसरं पदक मिळवून दिलं. याआधी 2000 साली सिडनी ऑलम्पिकमध्ये कर्नम मल्लेश्वरी हिने पदक जिंकलं होतं. ऑलम्पिकमध्ये सिल्वर जिंकणारी मीराबाई ही बॅडमिंटन स्टार पी.व्ही सिंधूनंतर पहिली भारतीय महिला आहे. तिच्या या कामगिरीचं सर्व स्तरातून कौैतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
Could not have asked for a happier start to @Tokyo2020! India is elated by @mirabai_chanu’s stupendous performance. Congratulations to her for winning the Silver medal in weightlifting. Her success motivates every Indian. #Cheer4India #Tokyo2020 pic.twitter.com/B6uJtDlaJo
— Narendra Modi (@narendramodi) July 24, 2021
26 वर्षीय मीराबाई ही मूळची मनिपूर राज्यातील असून तिचं संपूर्ण नाव साइखोम मीराबाई चानू असं आहे. ती भारताची आघाडीची महिला वेट लिफ्टर आहे. 2018 मध्ये तिला भारत सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने देखील सन्मानित केलं होतं. 2018 मध्ये तिला क्रीडा विभागातून पद्मश्री पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता.
हे ही वाचा :
Tokyo Olympics 2021 : 24 जुलै भारतासाठी यंदाच्या ऑलिम्पिकमधील महत्त्वाचा दिवस, ‘हे’ आहे कारण
(Indian weightlifter Chanu Saikhom Mirabai finishes in second place Won Silver medal her family reation was awsome)