Tokyo Olympics 2021: भारतीय महिलांच सुवर्णपदकाचं स्वप्न तुटलं, कांस्य पदकाची आशा अजूनही कायम, असे असेल आव्हान

| Updated on: Aug 04, 2021 | 6:09 PM

ऑलिम्पकच्या इतिहासांत पहिल्यांदाच सेमीफायनलपर्यंत मजल मारलेल्या महिला हॉकी संघाचा अर्जेंटीनाने 2-1 ने पराभव केला आहे. त्यामुळे सुवर्णपदकासह रौप्य पदकाचे स्वप्न तुटले असले तरी तिसऱ्या स्थानासाठीचे भारताचे आव्हान अजूनही कायम आहे.

Tokyo Olympics 2021: भारतीय महिलांच सुवर्णपदकाचं स्वप्न तुटलं, कांस्य पदकाची आशा अजूनही कायम, असे असेल आव्हान
भारतीय महिला हॉकी संघ
Follow us on

Tokyo Olympics 20-2021 : ‘हार कर जितने वाले को बाजीगर केहते हे!’ या प्रसिद्ध सिनेमा डायलॉगला साजेसा खेळ महिला हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पकमध्ये केला आहे. सुरुवातीला सलग तीन सामने गमावल्यानंतर एखाद्या घायाळ वाघिनीप्रमाणे भारतीय महिलांनी स्पर्धेत पुनरागमन केलं. ग्रुपस्टेजमधून उपांत्यूपूर्व फेरीत येत त्याठिकाणी ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या प्रतिस्पर्धी संघाला धूळ चारत सेमीफायनल गाठली. त्यानंतर सेमीफायनलमध्येही अगदी तगडी टक्कर दिली पण अवघ्या एका गोलच्या फरकाने भारतीय महिला पराभूत झाल्या. ज्यामुळे सुवर्णपदकाचे त्यांचे स्वप्न तुटले.

सेमीफायनल पराभवानंतरही तिसऱ्या स्थानासाठीचा भारतीय महिलांचा सामना अजून बाकी आहे. ज्या सामन्यातील विजय त्यांना कांस्य पदक मिळवून देईल. या सामन्यासाठी भारतीय महिलांसमोर ग्रेट ब्रिटनचे आव्हान असणार आहे. ग्रेट ब्रिटेनसोबतचा भारतीय महिलांचा सामना 6 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे.

चुरशीच्या सेमीफायनलमध्ये थोडक्यात पराभव

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारतीय महिलांनी सामन्याच्या सुरुवातीलाच गोल करत आघाडी मिळवली होती. स्टार खेळाडू गुरजीत कौरने पेनल्टी कॉर्नरच्या मदतीने दुसऱ्या मिनिटाला गोल करत भारताला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या क्वॉर्टरपर्यंत भारताने आघाडी कायम ठेवली पण दुसऱ्या क्वॉर्टरच्या 18 व्या मिनिटाला अर्जेंटीनाच्या कीनोएल बेरिनुएवोने गोल करत सामन्यात 1-1 ची बरोबरी साधली. ज्यानंतर तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये पुन्हा बेरिनुएवोने 36 व्या मिनिटाला गोल करत 2-1 ची विजयी आघाडी घेतली. ज्यानंतर भारतीय महिलांनी बरीच आक्रमणं केली. जी अर्जेंटीनाने परतवून लावली आणि अखेर भारतीय महिला 2-1 ने पराभूत झाल्या.

हे ही वाचा

Tokyo Olympics 2021: महिला हॉकी टीमच्या पदकाच्या आशा अजूनही कायम, अर्जेंटीनाकडून पराभव, आता लढाई इंग्लंडशी

Tokyo Olympics 2021: नीरज चोप्राचा ऐतिहासिक थ्रो, मिळवलं फायनलचं तिकिट, भारताला पदकाची आशा

Tokyo Olympics 2021: भारताच्या खिशात आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य पदकावर कोरलं नाव

(Indian Womens hockey team will play against great britan for bronze medal at tokyo olympics)