नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर भारतीय खेळाडू भारतात परतले आहेत. संपूर्ण देशाला सध्या सर्व ऑलिम्पिक खेळाडूंवर अभिमान असून नवी दिल्ली विमानतळावर उपस्थित चाहत्यांनी तर ऑलिम्पिक खेळाडूंना अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. पदक विजेत्यांमधील एक असणाऱ्या पैलवान बजरंग पूनियाचं (Bajrang Punia) देखील जंगी स्वागत यावेळी करण्यात आलं. बजरंगने नवी दिल्ली विमानतळाबाहेर पाऊल ठेवताच त्याच्या नावाचा जयघोष होऊ लागला.त्याच्या स्वागतसाठी अनेक चाहते त्याठिकाणी उपस्थित होते.
प्रचंड गर्दीमुळे बजरंगला घेण्यासाठी आलेल्या गाडीपर्यंत पोहचणंही त्याला अवघड झालं होतं. त्याने त्याचे वडिल आणि प्रशिक्षक यांनाही गाडीत घेत त्यांच्यासोबत एकप्रकारे मिरवणूकच काढली. यावेळी प्रचंड गर्दी पाहून बजरंग म्हणाला, “मला खूप चांगलं वाटत आहे, की मला इतकं प्रेम सन्मान मिळत आहे. मला हे सर्व पाहून आनंद होत आहे. मी पुढील ऑलिम्पिकसाठी आणखी तयारी करुन आणखी चांगली कामगिरी करेन.”
#Tokyo2020 bronze medalist wrestler Bajrang Punia receives grand welcome at Delhi airport on his arrival from Japan
“It feels great to receive such kind of love and respect,” Punia says pic.twitter.com/2rtgYyNzgW
— ANI (@ANI) August 9, 2021
आज सायंकाळी क्रिडा मंत्री अनुराग ठाकुर टोक्यो ओलिम्पिकमध्ये पदक विजेत्या खेळाडूंशी भेट घेऊन त्यांच स्वागत करणार आहेत. टोक्योमध्ये भारताला मिळालेल्या सात पदकांत भालाफेक खेळात नीरज चोप्राला सुवर्णपदक, वेटलिफ्टर मिराबाई चानू आणि पैलवान रवी दहियाला रौप्य पदक मिळालं. तर बॅडमिंटपटू पीव्ही सिंधू आणि पैलवान बजरंग पूनियासह बॉक्सर लवलीना बोरगोहेनला कांस्य पदक मिळालं. याशिवाय सांघिक खेळात भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्य पदकावर नाव कोरलं
इतर बातम्या
Tokyo Olympics वरुन परतले भारताचे वीर, विमानतळावर जंगी स्वागत, पाहा VIDEO
Tokyo Olympics 2021 : टोक्यो ऑलिम्पिकची सांगता, भारताकडून बजरंग पुनियाने फडकावला तिरंगा!
(Indian Wrestler Bajrang Punia welcome by many fans at delhi airport)