Tokyo Olympic 2021 : भारताने आजच्या दिवसाची सुरुवात महिला हॉकी संघाच्या पराभवाने केल्यानंतर आणखी एक मोठा पराभव भारताच्या नशिबी आला आहे. कुस्तीच्या 65 किलो वजनी गटात भारताचा आघाडीचा पैलवान बजरंग पुनिया (Bajrang Puniya) पराभूत झाला आहे. त्यामुळे फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यापासून तो थोडक्यात राहिला. ज्यामुळे त्याच्या हातातून सुवर्णपदक मिळवण्याची संधीही निसटली आहे. अझरबैजानचा हाजी अलीयेब (Haji Aliyev) याने पुनियाला 12-5 च्या फरकाने मात दिली. पण बजरंगकडे अजूनही कांस्य पदक पटकावण्याची संधी असून त्यामुळे भारताला पदक मिळण्याच्या आशा अजूनही कायम आहेत.
#IND @BajrangPunia goes down 5-12 to #AZE Haji Aliyev in Men’s Freestyle 65kg semifinal. He will now play for the #Bronze at #Tokyo2020 tomorrow, 7 Aug.
Stay tuned for more updates on #IndiaAtOlympics. pic.twitter.com/FiLYSKSqvn
— SAIMedia (@Media_SAI) August 6, 2021
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इराणच्या मोर्तेजा घियासीला (Morteza Ghiasi) मात देत सेमीफायनलमध्ये बजरंगने प्रवेश केला होता. पण सेमीफायनलमध्ये त्याला पराभव स्वीकारावा लागला आहे. पण सेमीफायनलपर्यंत पोहोचल्याने बजरंगकडे ऑलिम्पिकमधील कांस्य पदक मिळवण्याची संधी अजूनही आहे. शनिवारी (7 ऑगस्ट) कांस्य पदकाच्या लढाईसाठी बजरंग पुन्हा मॅटवर उतरेल. रशियाच्या पैलवानाशी त्याचा सामना होणार आहे.
बजरंग आणि हाजी अलीयेव यांच्यातील सेमीफायनलच्या सामन्यात सुरुवातीपासून हाजी याने आपला दबदबा कायम ठेवला होता. सुरुवातीलाच 4 गुण घेतलेल्या हाजीसमोर पुनिया एकच गुण घेऊ शकला. ज्यामुळे तो पहिल्या राउंडमध्ये 4-1 ने पिछाडीवर पडला. त्यानंतर दुसऱ्या राउंडमध्ये बजरंगने 4 आणखी गुण घेतले. पण तोवर पैलवान हाजी याने तब्बल 8 गुण घेत सामन्यात 12-5 ची विजयी आघाडी घेतली. जी विजयी आघाडी पुनिया अखेपर्यंत भेदू न शकल्याने तो सेमीफायनलमध्ये पोहचू शकला नाही.
हे ही वाचा :
रवी दहियाचं गोल्ड हुकलं, तिहार जेलमध्ये सुशीलकुमारला अश्रू अनावर
Tokyo Olympic 2021 : पैलवान रवी दहियाची धडाकेबाज कामगिरी, कुस्तीत रौप्य पदकाची कमाई
Tokyo Olympic 2020 : ‘चक दे इंडिया’, 41 वर्षानंतर हॉकीमध्ये पदक, भारताचा जर्मनीवर 5-4 ने विजय
(Indian Wrestler Bajrang Puniya defeated by Haji Aliyev in Semi final at tokyo Olympics wrestling looses hopes of medal)