Tokyo Paralympics : भारतीय पॅराएथलिट्सने टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics 2020) पदकांची लयलूट कायम ठेवली आहे. नुकताच भारताने बॅडमिंटनमध्ये (Badminton) एक पदक निश्चित केलं. भारताचं हे दुसरं पदक आहे. प्रमोद भगतनंतर आता भारताचे सुहास यथिराज (Suhas Yathiraj) यांनी सेमीफायनलमध्ये अप्रतिम कामगिरी करत फायनलचं तिकीट मिळवलं आहे. त्यामुळे आता रौैप्य पदक निश्चित झालं असून सुवर्ण पदकाची आशाही निर्माण झाली आहे.
सुहास यथिराज हे पॅराएथलीट असण्यासोबतच नोएडाचे DM देखील आहेत. त्यांनी पुरुषांच्या SL4 कॅटेगरीमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूवर सहज विजय मिळवत पुढील फेरी गाठली. सुहास यांनी इंडोनेशियाच्या खेळाडूला सरळ दोन सेट्समध्ये नमवत विजय मिळवला. यावेळी पहिला सेट 21-9 तर दुसरा सेट 21-15 ने सुहास यांनी जिंकला. सुहास यथिराज हे आता फायनलमध्ये पोहोचल्याने रौप्य पदकतर निश्चित झालं आहे. पण या पदकाला सुवर्णपदकात बदलण्याची सुवर्णसंधी सुहास यांना रविवारी असेल.
History under making!!!
Suhas L Y, #IAS, DM G.B.Nagar (NOIDA), UP #IND in Men’s Singles #parabadminton SL4 Final.
He beats #INA S. Fredy 2-0 in semifinals
Now will be playing for #Gold on 5th Sep??#Cheer4Suhas#Cheer4India#Praise4Para pic.twitter.com/xmCa3nF029
— IAS Association (@IASassociation) September 4, 2021
भारताचा अजून एक पॅरा बॅडमिंटनपटू तरूण ढिल्लन सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्याने त्याच फायनलमध्ये पोहचण्याचं स्वप्न तुटलं. त्याला लुकास मजूरने तीन सेट्स चाललेल्या सामन्यात मात दिली. तरूण ढिल्लनने हा सामना 16-21, 21-16, 18-21 अशा तीन सेट्ममध्ये गमावला. या पराभवामुळे त्याची रौप्य पदकासह, सुवर्णपदकाची आशा संपली आहे. मात्र तिसऱ्या स्थानासाठीच्या कांस्य पदकाची आशा अजूनही कायम असून तो यासाठी सामना खेळणार आहे.
हे ही वाचा –
(Indians parabadminton plauyer suhas yathiraj Dm of noida enter in mens singles final secures medal)