Tokyo Paralympics : भारताचे पॅराबॅडमिंटनपटू तसेत नोएडाचे जिल्हाधिकारी असणाऱ्या सुहास यथिराज (Suhas Yathiraj) यांनी टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics 2020) भारताला रौप्य पदक मिळवून दिले आहे. 38 वर्षीय सुहास यांनी दमदार कामगिरी करत अंतिम सामन्या पर्यंत धडक घेतली होती. पण फायनलमध्ये फ्रान्सच्या लुकास मजूर याने त्यांना मात दिल्याने सुवर्णपदकाजागी सुहास यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.
फ्रान्सचा लुकास आधीपासूनच स्पर्धेत सुवर्णपदकाचा तगडा दावेदार मानला जात होता. याचे कारण त्याने याआधी देखील सुहास यांना पराभूत केलं होतं. पण अंतिम सामना मात्र अगदी अटीतटीचा झाला. तीन सेट्समध्ये पार पडलेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी चुरशीची टक्कर दिली. पहिला सेट सुहास यांनी 21-15 च्या फरकाने जिंकला. ज्यामुळे सामन्यात त्यांनी 1-0 ची आघाडी घेतली. पण नंतर लुकासने पुनरागमन करत दुसरा सेट 21-17 ने तर तिसरा सेट 21-15 ने जिंकत सामन्यात विजय मिळवला. या विजयासह लुकासने सुवर्णपदक पटकावलं आणि सुहास यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.
What. A. Match ?#FRA‘s Lucas Mazur and #IND‘s Suhas Yathiraj served up a true classic in the #ParaBadminton Men’s Singles SL4 Final. ? #Gold #Silver #Tokyo2020 #Paralympics pic.twitter.com/jUjC8QqboA
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) September 5, 2021
सुहास यथिराज सुवर्णपदक मिळवण्यात यशस्वी राहिले असले तरी त्यांच्या सामन्यानंतर काही तासांत झालेल्या सामन्याक पॅरा बॅडमिंटनपटू कृष्णा नागरने (Krishna Nagar) सुवर्णपदक मिळवत भारताची पदक संख्या थेट 19 वर पोहोचलवली. अंतिम सामन्यात SH6 स्पर्धेत हाँगकाँगच्या चू मॅन कई याला मात देत कृष्णाने सुवर्णपदक खिशात घातलं. कृष्णाने तीन सेट्ममध्ये हा सामना जिंकला. पहिला सेट 14 मिनिटांमध्ये कृष्णाने 21-17 च्या फरकाने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये कई याने पुनरागमन करत 21-16 च्या फरकाने सेट आपल्या नावे केला. पण अखेरच्या आणि निर्णायक सेटमध्ये मात्र कृष्णाने कोणतीच चूकी न करता 15 मिनिटांमध्ये सेट 21-17 च्या फरकाने जिंकत सामना आपल्या नावे केला. या विजयासोबतच कृष्णाने सुवर्णपदक जिंकला. विजयानंतर कृष्णाचा आनंद पाहण्याजोगा होता.
हे ही वाचा –
(Indians parabadminton player suhas yathiraj Dm of noida Won Silver medal at tokyo paralympics 2020)