Tokyo Olympics 20-2021: टोक्यो ओलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेत आजचा दिवस भारतासाठी शानदार ठरला. भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) चीनच्या ही बिंगजियाओ (He Bingjiao) हिला पहिल्या सेटमध्ये 13-21 आणि दुसऱ्या सेटमध्ये 15-21 ने नमवत कांस्य पदक पटकावलं. दुसरीकडे भारतीय हॉकी संघाने देखील क्वॉर्टर फायनलच्या सामन्यात ग्रेट ब्रिटेन संघाला 3-1 ने नमवत 41 वर्षानंतर सेमीफायनलमध्ये जागा मिळवली. उद्या म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी भारतीय खेळाडू आणखी काही खेळांत नशीब आजमवून पदकं पटकावण्यासाठी जोमाचे प्रयत्न करणार आहेत.
दिवसाची सुरुवात भारतीय खेळाडू एथलेटिक्स खेळांपासून करतील. भारताची धावपटू दुती चंद महिलांच्या 200 मीटर शर्यतीत सेमीफायनलमध्ये पात्र होण्यासाठी धावेल. भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता ही शर्यत असेल.
भारताचा महिला हॉकी संघ पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत पोहचला असून 2 ऑगस्ट रोजी ऑस्ट्रेलिया संघासोबत सामना खेळेल. या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय महिला पदकापासून केवळ एक पाऊल दूर राहतील भारतीय वेळेनुसार सकाळी 8:30 वाजता हा सामना खेळवला जाईल. जपानच्या ओसाका शूटिंग रेंजमध्ये भारतीय निशानेबाज आतापर्यंत खास कामगिरी करु शकलेले नाही. पण 2 ऑगस्ट रोजी संजीव राजपूत आणि ऐश्वर्य तोमर 50 मीटर रायफलम स्पर्धेत भाग घेतील ही स्पर्धा भारतीय वेळेनुसार सकाळी 8 वाजता सुरु होईल.
2 ऑगस्ट रोजीची संध्याकाळ भारतीय प्रेक्षकांसाठी महत्त्वाची असेल. टोक्योच्या एथलेटिक्स फील्डमध्ये भारताची कमलप्रीत कौर डिस्कस थ्रोमध्ये पदक जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. पात्रता फेरीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या कमलप्रीतकडून पदक मिळण्याच्या सर्वाधिक आशा आहेत. भारतीय वेळेनुसार साय़ंकाळी 4:30 वाजता हा सामना सुरु होईल.
— rajeev mehta (@rajeevmehtaioa) August 1, 2021
इतर बातम्या:
Tokyo Olympics 2021: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, 41 वर्षानंतर मिळवला सेमीफायनलमध्ये प्रवेश
Tokyo Olympics 2021: उत्कृष्ठ! पीव्ही सिंधूच्या खिशात कांस्य पदक, भारताची आणखी एका पदकाची कमाई
ऑलिम्किमधून परतल्यावर लवलीनाला आसाम सरकारकडून खास गिफ्ट, गावकरीही होणार आनंदी
(Indias 2nd august Schedule of Tokyo Olympic 2021)