Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics-2020) भारताने आणखी पदक पक्कं केलं आहे. भारताची बॉक्सर लवलीना बोरगोहेनने (Lovlina Borgohain) उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे बॉक्सिंगच्या नियमांनुसार तिने किमान कांस्यपदक पक्के केले आहे. आता सेमीफायनलचा सामना जिंकल्यास रौप्य आणि त्यानंतर अंतिम सामना जिंकल्यास ती सुवर्णपदकही जिंकू शकते. महिलांच्या वेल्टरवेट कॅटेगरीमध्ये तिने हे यश मिळवले आहे.
उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात लवलीनाने चीनी ताइपेच्या बॉक्सरला पराभूत केलं. लवलीनाच्या या यशामुळे भारताचं आतापर्यंतच टोक्यो ओलिम्पिकमधील हे दुसरं मेडल असेल. सेमीफायनलमध्ये लवलीनाचा सामना टर्कीच्या बी. सुरमेनेली (B. Surmeneli) हिच्यासोबत असेल. उपांत्य फेरीच्या सामन्यात चीनी ताइपेची बॉक्सर एन.सी. चेन (N. C. Chen) हिला लवलिनाने पहिल्या राउंडमध्ये 3-2 ने नमवलं. त्यानंतर दुसऱ्या फेरीत पाचही जजेसनी लवलीनाच्या बाजूने निर्णय दिला. तिसऱ्या राउंडमध्ये चीनी ताइपेच्या बॉक्सरने सामन्यात पुनरामगन करण्याचा पूर्ण प्रयत्न केलं. पण लवलीनाच्या डिफेन्ससमोर चेनला पुनरागमन न करता आल्याने अखेर सामन्यात लवलीनाने विजय मिळवला.
भारतासाठी ऑलिम्पिक पदक मिळवणारी लवलीना आधापासून बॉक्सर नव्हती. ती आधी किक बॉक्सिंग करायची. तिच्या दोन मोठ्या बहिनी लीमा आणि लीचा या देखील किक बॉक्सर आहेत. त्यामुळे तिनेही किक बॉक्सिंग खेळायला सुरुवात केली होती. पण नंतर तिला खास कामगिरी करता न आल्याने तिने SAI ने ठेवलेल्या बॉक्सिंग ट्रायलमध्ये भाग घेतला. लवलीनाने 2012 पासून बॉक्सिंगची ट्रेनिंग सुरु केली. त्यानंतर मागील 9 वर्षांच्या मेहनतीची फळ तिला आज मिळाले आहे.
लवलिनाच्या सामन्याआधी 57 किलोग्राम वर्गात भारताची बॉक्सर सिमरनजीत कौरने सहभाग घेतला होता. राउंड ऑफ 32 च्या सामन्यात भारताची सिमरनला थायलंडच्या अनुभवी बॉक्सरने दोन हात केले होते. टोक्यो ओलिम्पिकमध्ये सिमरनचा हा पहिलाच सामना होता. तिने ओलिम्पिक डेब्यूही केला होता. पण पहिल्याच सामन्यात तिच्या हाती निराशा लागली.
इतर बातम्या:
Tokyo Olympics 2021: भारताला मोठा झटका, मेरिकोमचा पराभव; ऑलम्पिकमधील दुसऱ्या पदकाच्या आशा संपल्या
(Indias boxer lovlina borgohain secure medal at Tokyo Olympics by entering semi final)