Tokyo Olympics 20-2021 : भारतीय पुरुष हॉकी संघाने (Indian Men Hockey Team) टोक्यो ओलिम्पिकमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात ग्रेट ब्रिटन संघाला 3-1 ने नमवत सेमी फायनलमध्ये जागा मिळवली आहे. 1980 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघ पदकाच्या इतक्या जवळ पोहोचला आहे. या विजयानंतर सर्व देश भारतीय हॉकी संघाची वाह वाह करत असून हॉकी संघाचा माजी कर्णधार वीरेन रसकिन्हा देखील भावूक झाले आहेत. त्यांनी भारतीय संघाला शुभेच्छा देखील दिल्या.
1980 नंतर पहिल्यांदाच ओलिम्पिकमध्ये भारतीय संघ पदकाच्या इतक्या जवळ पोहोचला आहे. मॉस्को इथे झालेल्या 1980 च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यानंतर भारताला हॉकीमध्ये एकही पदक जिंकता आले नसल्याने यंदाची ऑलिम्पिक भारतासाठी एक सुवर्णसंधी आहे. हॉकीमध्ये भारताकडे आठ सुवर्णपदकं आहेत.
वीरेन रसकिन्हा यांनी हॉकी संघाला शुभेच्छा देताना ट्विटरवर लिहिलं, “मॉस्को ओलिम्पिक वेळी 1980 मध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारतीय हॉकी संघासाठी आजचा क्षण सर्वात मोठा आहे. मला संपूर्ण संघावर गर्व आहे. माझ्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू आहेत. तुम्ही टोक्योमध्ये करत असलेल्या कामगिरी बद्दल तुमचे धन्यवाद.”
यानंतर केलेल्या दुसऱ्या ट्विटमध्ये वीरेन रसकिन्हा लिहीतात, “ओलिम्पिक क्वॉर्टर फायनल जिंकण्यासाठी भूख, आग आणि इच्छा आवश्यक होती. पुरुष हॉकी संघाने ते सर्व दाखवले. आता बेल्जियम विरुद्धच्या सामन्यासाठीही तयार व्हा! संपूर्ण देश तुमच्याकडे पाहत असून तुमचाच जयकार करणार आहे.”
Greatest moment for Indian Hockey since the 1980 Gold medal at the Moscow Olympics. I am just so proud of the team. Congrats boys. I have tears of joy in my eyes. Thank you for what you guys are doing at Tokyo ??????
— Viren Rasquinha (@virenrasquinha) August 1, 2021
इतर बातम्या:
Tokyo Olympics 2021: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, 49 वर्षानंतर मिळवला सेमीफायनलमध्ये प्रवेश
Tokyo Olympics 2021: उत्कृष्ठ! पीव्ही सिंधूच्या खिशात कांस्य पदक, भारताची आणखी एका पदकाची कमाई
ऑलिम्किमधून परतल्यावर लवलीनाला आसाम सरकारकडून खास गिफ्ट, गावकरीही होणार आनंदी
(Indias Former hockey captain viren rasquinha have tears of joy in eyes after hockey team enters in semis)