Tokyo Olympic 2021 : ‘हा’ खेळाडू ठरला भारतीय हॉकी संघाच्या विजयाचा शिल्पकार, कांस्य पदकासाठी केलं जीवाचं रान
तब्बल 41 वर्षानंतरचा वनवास संपवून भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पकमध्ये पदक मिळवलं. या पदकासाठी संपूर्ण संघाने खूप मेहनत घेतली पण एका खेळाडूने सर्वाधिक उत्कृष्ट खेळ करत पदक भारताच्या गळ्यात घातलं.
1 / 5
भारतीय पुरुष हॉकी संघाने (Indian Mens Hpcky team) जर्मनीवर ऐतिहासिक विजय मिळवत कांस्य पदक खिशात घातलं. जर्मनीच्या आक्रमनांना सडेतोड उत्तर देत आक्रमणं करत भारताने 5-4 ने सामन्यात विजय मिळवला. अवघ्या एका गोलच्या फरकाने भारताने विजय मिळवला असला तरी जर्मनीची बरीच तगडी आक्रमणं नाकाम करण्यात महत्त्वाचा वाटा होता तो भारताचा गोलकिपर पी आर श्रीजेश (pr sreejesh) याचा. श्रीजेशने संपूर्ण सामन्यात अगदी एका संरक्षक भिंतीप्रमाणे कामगिरी करत जर्मनीला भारतावर आघाडी घेऊ दिली नाही. त्यामुळे भारताच्या विजयात त्याचा सिंहाचा वाटा ठरला.
2 / 5
संपूर्ण टोक्यो ओलिम्पिकमध्ये श्रीजेशने अनेक गोल अडवले आहेत. गोलकीपर पीआर श्रीजेशने क्वॉर्टर फायनलच्या सामन्यात ब्रिटेन विरुद्ध केलेल्या शानदार गोलकिंपिंगमुळे तो सामना जिंकण्यात भारताला यश आलं. आज जर्मनी विरुद्ध देखील त्याने तब्बल 9 शानदार सेव्ह केल्या.
3 / 5
भारत आणि जर्मनी यांच्यातील सामन्या दरम्यानही शेवटच्या मिनिटांत जर्मनीला एक पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. जर्मनीने हा गोल करताच त्यांनी सामन्यात बरोबरी साधली असती. पण याच वेळी श्रीजेशने अप्रतिम सेव्ह करत भारताचा विजय पक्का केला.
4 / 5
संपूर्ण टोक्यो ओलिम्पिक स्पर्धेसह अंतिम सामन्यात श्रीजेशने आपल्या संपूर्ण अनुभवाचा फायदा घेत उत्कृष्ट गोलकिंपिंग केली. अंतिम सामन्यात जर्मनी संघाला 13 कॉर्नर मिळाल्या ज्यातील केवळ एकच कॉर्नर गोलमध्ये बदलण्यात जर्मनीला यश आलं. बाकी सर्व वेळी श्रीजेशने गोलपोस्टमध्ये भिंत बनून उभा होता.
5 / 5
जवळपास 13 वर्षे संघासाठी खेळणाऱ्या श्रीजेशने भारतीय संघाला अनेक अप्रतिम विजय मिळवून देत स्वत:ला एक अप्रतिम गोलकिपर म्हणून सिद्ध केलं आहे. 2014 च्या आशियाई खेळात (Asian Games) सुवर्णपदक, कॉमनवेल्थ खेळात रौप्यपदक अशा एक न अनेक भारतीय हॉकी संघाच्या विजयात त्याचा मोठा वाटा आहे.