Tokyo Paralympics : टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics 2020) भारतीय बॅडमिंटनपटूंची अप्रतिम कामगिरी सुरुच आहे. नुकतंच भारताच्या प्रमोद भगत (Pramod Bhagat) आणि मनोज सरकार (Manoj Sarkar) यांनी डबल धमाका करत SL3 स्पर्धेत भारताला दोन पदकं मिळवून दिली. प्रमोदने सुवर्ण तर मनोजने कांस्य पदकावर नाव कोरलं.
मनोज सेमीफायनलच्या सामन्यात पराभूत झाला. मात्र तरीदेखील तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात त्याने पुनरागमन करत दमदार खेळ दाखवला. तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात त्याने विजय मिळवत कांस्य पदक जिकंलं आहे. त्याने जपानच्या दायसुके फुजिहाराला मात देत कांस्य पदक मिळवलं. तर दुसरीकडे प्रमोद याने आधी सेमीफायनलच्या सामन्यात जपानच्या दायसुके फुजिहाराला नमवत अंतिम सामन्यात धडक घेतली होती. अंतिम सामन्यात पोहचताच त्याने किमान रौप्य पदक निश्चित केलं होतं. मात्र अंतिम सामन्यातही धडाकेबाज कामगिरी करत प्रमोदने ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथलला पराभूत केलं. या विजयासोबतच प्रमोदने भारताला स्पर्धेतील सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. तर दुसरीकडे
मनोज आणि दायसुके यांच्यातील सामना सुरुवातीपासून अत्यंत चुरशीचा होत होता. पहिला सेटतर अगदीच अटीतटीचा झाला. त्यामध्ये मनोजने 22-20 च्या फरकाने विजय मिळवत सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये मात्र मनोजने सुरुवातीपासून वर्चस्व मिळवून ठेवलं आणि सामना 21-13 च्या फरकाने जिंकत कांसपदक पटकावलं.
Manoj does it for ??! #IND‘s Manoj Sarkar bags the #Bronze medal in #ParaBadminton Men’s Singles SL3, getting the better of #JPN‘s Daisuke Fujihara. ?
For the second time today, 2⃣ Indians make up the podium places. Wow. #Tokyo2020 #Paralympics pic.twitter.com/CrW8NMBC3v
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) September 4, 2021
दोन्ही सेटमध्ये सरळ विजय मिळवत प्रमोदने सामना जिंकला. पहिला सेट 21-14 च्या फरकाने जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये डॅनियलने पुनरागमन करण्याचा संपूर्ण प्रयत्न केला. पण शेवटच्या काही वेळात प्रमोदने उत्कृष्ट खेळ दाखवल सेट 21-17 च्या फरकाने जिंकत सुवर्णपदक खिशात घातलं.
भारताने बॅडमिंटनमध्ये (Badminton) आणखी दोन पदकं निश्चित केली आहेत. यामध्ये एक पदक हे भारताचे सुहास यथिराज (Suhas Yathiraj) यांनी सेमीफायनलमध्ये अप्रतिम कामगिरी करत फायनलचं तिकीट मिळवल्यानंतर केलं आहे. त्यांनी पुरुषांच्या SL4 कॅटेगरीमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात इंडोनेशियाच्या खेळाडूला सरळ दोन सेट्समध्ये नमवत विजय मिळवला. यावेळी पहिला सेट 21-9 तर दुसरा सेट 21-15 ने सुहास यांनी जिंकला. सुहास यथिराज हे आता फायनलमध्ये पोहोचल्याने रौप्य पदकतर निश्चित झालं आहे. पण सुवर्णपदकाची आशाही कायम आहे. सुहास यांच्याच प्रमाणे पॅराबॅडमिंटनपटू कृष्णा नागरने पुरुष एकेरीच्या SH6 गटामध्ये सेमीफायनलच्या सामन्यात ग्रेट ब्रिटेनच्या क्रिस्टन कूंब्सला मात देत भारताच्या खात्यात आणखी एक पदक निश्चित केलं आहे. 22 वर्षीय कृष्णाने या सामन्यात जगातील पाचव्या क्रमांकाच्या क्रिस्टनला मात दिली. त्याने दोन सरळ सेट्मध्ये विजय मिळवत सामना खिशात घातला. पहिला सेट त्याने 21-10 ने तर दुसरा 21-11 ने जिंकत फायनलमध्ये जागा मिळवली.
हे ही वाचा –
(Indias parabadminton player Manoj Sarkar Won Bronze Medal at mens singles tokyo paralympics)