नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या 23 तारखेला सुरु झालेली टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा अखेर संपली आहे. त्यामुळे सर्व देशांचे खेळाडू टोक्योमधून (Tokyo Olympics 2020) आपआपल्या घरी परतू लागले आहेत. भारताचा हॉकी संघ आणि एथलेटिक्स संघ देखील नुकताच भारतात परतला आहे. एथलेटिक्स संघाती सदस्य 9 ऑगस्ट रोजी टोक्योतून नवी दिल्लीला पोहोचले. तर भारताची पुरुष आणि महिला हॉकी टीम देखील एकत्रच परतली.
दोन्ही संघ एकाच दिवशी आले असले तरी एथलेटिक्स संघ दुसऱ्या आणि हॉकी संघ दुसऱ्या विमानातून प्रवास करत होता. पण अखेऱ एकाच विमानतळावर पोहोचल्यावर तेथे उपस्थितांनी खेळाडूंचे जंगी स्वागत केलं. यावेळी सर्व खेळाडूंना फुलांची माळ घातल त्यांचा गौरव केला. उपस्थित नागरिक जोरजोरात घोषणार देत जल्लोष करत होते.
That’s Indian Hockey team that just arrived in #India from #Tokyo2020 pic.twitter.com/FEir2wNqlS
— Athletics Federation of India (@afiindia) August 9, 2021
टोक्योमध्ये भारताला मिळालेल्या सात पदकांत भालाफेक खेळात नीरज चोप्राला सुवर्णपदक, वेटलिफ्टर मिराबाई चानू आणि पैलवान रवी दहियाला रौप्य पदक मिळालं. तर बॅडमिंटपटू पीव्ही सिंधू आणि पैलवान बजरंग पूनियासह बॉक्सर लवलीना बोरगोहेनला कांस्य पदक मिळालं. याशिवाय सांघिक खेळात भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्य पदकावर नाव कोरलं.
Welcome home champions!
?? Athletics Team is back from the #Tokyo2020 Olympics. Lets welcome them with joy and excitement and #Cheer4India.
Watch the video and send in your best wishes in the comments below ??@PMOIndia @ianuragthakur @NisithPramanik @afiindia @WeAreTeamIndia pic.twitter.com/9wJrvdzjPC
— SAIMedia (@Media_SAI) August 9, 2021
इतर बातम्या
Tokyo Olympics 2021 : टोक्यो ऑलिम्पिकची सांगता, भारताकडून बजरंग पुनियाने फडकावला तिरंगा!
(Indias Tokyo Olympics champions neeraj chopra indian athletics team Hockey teams boxers arrived at india)