Tokyo Olympic 2021 : भारतीय महिला हॉकी संघाने (Indians Women Hockey Team) यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) ऐतिहासिक कामगिरी करत सेमीफायलनपर्यंत धडक मारली. पण सेमीफायनलमध्ये तगड्या अर्जेंटीना संघाकडून आणि त्यानंतर तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत ग्रेट ब्रिटनकडून 4-3 ने पराभव मिळाल्यामुळे भारतीय महिलांचे पदक मिळवण्याचे स्वप्न अधुरे राहिले. या पराभवानंतर महिला संघाचा प्रशिक्षक श्योर्ड मरीन्ये याने त्याच्या पदाचा राजीनामा दिला.
त्याने हा राजीनामा संघाचा पराभव झाला म्हणून दिला नसून कुटुंबाला वेळ देता यावा यासाठी दिला असल्याचे सांगितले. सामन्यानंतर बोलताना मरीन्ये म्हणाला, “माझा यानंतर कोणताही प्लॅन नसून भारतीय महिला संघासोबत माझा हा शेवटचा सामना होता.”
समोर आलेल्या माहितीनुसार मरिन्ये आणि संघ व्यवस्थापन यांच्यात चर्चेनंतर भारतीय खेळ प्रधाकिरणाने (SAI) करार वाढवण्याचा प्रस्ताव देखील मरिन्ये समोर ठेवला होता. पण खाजगी कारण देत मरिन्येने हा प्रस्ताव अमान्य केला. मूळचा नेदरलँड्चा असणाऱ्या मरीन्येने 2017 मध्ये भारतीय पुरुष संघाचा प्रशिक्षक म्हणून जागा घेतली होती. त्यानंतर 2018 मध्ये महिला संघाचा प्रशिक्षक म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली होती.
हे ही वाचा :
गोल्ड हुकलं, तिहार जेलमध्ये सुशीलकुमारला अश्रू अनावर
(Indias Women hockey team Coach Sjoerd Marijne left the team)