टोकियो : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा (Tokyo Olympics 2020) प्रेक्षकांशिवाय खेळवली जाणार आहे. स्पर्धेच्या आयोजकांनी 8 जुलै रोजी याबाबतचा निर्णय घेतला आहे. जपानमधील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे हे पाऊल उचलले गेले आहे. जपानचे ऑलिम्पिक मंत्री तमायो मारुकावा म्हणाले की, टोकियो खेळांदरम्यान प्रेक्षकांना परवानगी न देण्याचे मान्य केले आहे. टोकियो 2020 स्पर्धेचे अध्यक्ष सेइको हाशिमोटो म्हणाले की, अशा प्रकारे खेळांचे आयोजन करावे लागत आहे, त्याबद्दल खेद आहे. तिकीट खरेदी केलेल्या प्रेक्षकांची त्यांनी माफी मागितली. (Japan govt says Tokyo Olympics 2020 to be held without audience)
जपानचं सरकार, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि जपान ऑलिम्पिक समितीने हा निर्णय घेतला आहे. साथीच्या आजारामुळे वर्षभरासाठी पुढे ढकलली गेलेली ऑलिम्पिक स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. दरम्यान, स्पर्धा सुरू होण्याच्या दोन आठवडे आधी जपानमध्ये कोरोना विषाणूमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राजधानीत आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
8 जुलै रोजी कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी टोकियोमध्ये आणीबाणीची घोषणा केली. सुगा म्हणाले की, आणीबाणी सोमवारपासून लागू केली जाईल आणि 22 ऑगस्टपर्यंत राहील. म्हणजेच 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणारी ऑलिम्पिक स्पर्धा संपूर्ण आपत्कालीन उपाययोजनांसह आयोजित केली जाईल. ते म्हणाले की , भविष्यात पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू नये, यासाठी आपत्कालीन परिस्थितीची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
कोरोनाच्या संकटामुळे टोक्योच्या सार्वजनिक ठिकाणांवर सुरु असलेली ऑलम्पिक टॉर्च रिले थांबवण्यात आली आहे. टोक्योत मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे ऑलम्पिक खेळांपासून कोरोनाला दूर ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने टॉर्च रिले सार्वजनिक ठिकाणी समाप्त करण्याचा निर्णय घेतला. जपान सरकारने दिलेल्या माहितीनुसार टोक्योच्या खासकी फ्लेम लाइटिंग समारंभात टॉर्च रिलेच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
?️ The #OlympicTorchRelay is enjoying the ride in Chichibu, Saitama prefecture… literally ?
Check out the this @Olympics inspired train! ?⚫️???
Learn about torchbearer SUZUKI Hidetaro’s wish…
#Tokyo2020 | #UnitedByEmotion | #StrongerTogether | #HopeLightsOurWay pic.twitter.com/UmhbN0oCxm— #Tokyo2020 (@Tokyo2020) July 8, 2021
इतर बातम्या
Tokyo Olympics साठी भारतीय बॉक्सर सज्ज, ‘या’ खेळाडूंकडून पदक मिळवण्याची सर्वाधिक आशा
Tokyo Olympics साठी हिमा दास नाही, तर ‘ही’ भारतीय धावपटू पात्र, खेल रत्न पुरस्कारासाठीही शिफारस
(Japan govt says Tokyo Olympics 2020 to be held without audience)