Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेत भारताने आतापर्यंत वेटलिफ्टिंग आणि बॅडमिंटनमध्ये पदक मिळवलं असून आज अॅथेलिटक्स खेळातील पहिलं वहिलं पदकही मिळण्याची आशा होती. डिस्कस थ्रो (Discus Throw) स्पर्धेत भारताची कमलप्रीत कौर (Kamalpreet Kaur) हिने फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. मात्र अंतिम स्पर्धेत ती खास कामगिरी करु शकली नाही. ज्यामुळे तिला सहाव्या स्थानावर समाधान मानाव लागलं. सहा प्रयत्नांत 63.70 मीटर हा तिचा सर्वोत्कृष्ठ थ्रो ठरला.
स्पर्धेत अमेरिकेच्या वेलेरी ऑलमॅन हिने तब्बल 68.98 मीटर लांब थ्रो करत सुवर्णपदक खिशात घातलं. तर जर्मनीच्या क्रिस्टिन पुडिंजने 66.86 मीटर लांब थ्रो करत सिल्वर आणि क्यूबाच्या यामी पेरेजने 65.72 मीटर अंतर लांब थ्रो टाकत कांस्य पदक पटकावलं.फायनलच्या सामन्यात कमलप्रीतने पहिला थ्रो 61.62 मीटर लांब फेकला. त्यानंतर तिचा दुसरा थ्रो फाऊल ठरला. ज्यानंतकर तिसऱ्या थ्रोमध्ये 63.70 मीटर लांब थ्रो टाकत सहावं स्थान पटकावलं. हाच तिचा अंतिम सामन्यातील बेस्ट स्कोर ठरला. त्यामुळे ती शेवटच्या तीन थ्रोसाठी पात्र ठरली. पण अखेरच्या तिन्ही थ्रोमधील दोन थ्रो फाऊल ठरले. तर एक थ्रो केवळ 61.37 मीटर लांबच गेल्याने ती सहाव्या स्थानावरच राहिली आणि पदक मिळवण्यापासून हुकली. कमलप्रीत कौरने क्वालिफिकेशन राउंडमध्ये 64 मीटर थ्रो टाकत फायनलमध्ये जागा मिळवली होती.
Kamalpreet Kaur falls short of throwing her best distance, but bows out of #Tokyo2020 with #IND‘s best-ever finish in discus throw! ??
Best throw: 63.70m
Rank: 6️⃣th #StrongerTogether | #UnitedByEmotion | #Athletics— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 2, 2021
कमलप्रीत कौर पंजाबच्या श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील बादल गावची रहिवाशी आहे. तिने स्वत:च सांगितलं होतं की मी अभ्यासात जास्त हुशार नसल्याने प्रशिक्षकांनी मला एका राज्य स्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सांगितलं होतं. तिथे मी चांगल प्रदर्शन दाखवलं होतं. अभ्यासात जास्त हुशार नसल्याने कमलप्रीतला खेळांमध्ये जास्त लक्ष द्यावं असं वाटलं. ज्यानंतर तिने या डिस्कस थ्रोमध्ये अधिक सराव करत आज इथवरचा प्रवास पूर्ण केला आहे. 2019 मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ती पाचव्या स्थानावर होती. 2019 संस्करणमध्ये 60.25 मीटर डिस्कस थ्रो करत तिने सुवर्ण पदकही पटकावलं होतं.
संबंधित बातम्या
Tokyo Olympics 2021: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, 49 वर्षानंतर मिळवला सेमीफायनलमध्ये प्रवेश
PHOTOS : भारतीय महिला संघाची ऐतिहासिक कामगिरी, ‘या’ पाच जणींच्या जोरावर मिळवला सेमीफायनलमध्ये प्रवेश
(Kamalpreet Kaur finishes 6th in discus throw final lost medal very closely at tokyo Olympics)