Neeraj Chopra : सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरजची लगोलग पुढची घोषणा, म्हणतो माझा पुढचा ‘कार्यक्रम’ ठरला!

| Updated on: Aug 08, 2021 | 2:06 PM

नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत पहिला क्रमांक पटकावला आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. आता त्यानंतर लगेचच त्याने पुढचा प्लॅन तयार करत नव ध्येय ठरवलं आहे.

Neeraj Chopra : सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरजची लगोलग पुढची घोषणा, म्हणतो माझा पुढचा कार्यक्रम ठरला!
नीरज चोप्रा
Follow us on

Tokyo Olympic 2021 : भारताला एथलेटिक्समध्ये सुवर्णपदक मिळवून देत नीरज चोप्राने (Neeraj Chopra) स्वत:सह कोट्यवधी भारतीयांच स्वप्न पूर्ण केलं. नीरज खेळत असलेल्या भालाफेक खेळातील सर्वोच्च मान मिळाल्यानंतर इथेच नीरज थांबणार नसून त्याने लगोलगच त्याचा पुढील प्लॅन सांगत नव्या ध्येयाबद्दलही सांगितलं आहे. 87.53 मीटर दूर भाला फेकत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरजचं आता लक्ष्य 90 मीटर भाला फेंकत वर्ल्ड रेकॉर्ड तोडनं आहे.

भारताला व्यक्तीगत खेळामंध्ये अभिनव बिंद्रानंतर दुसऱ्यांदा सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज शनिवारच्या स्पर्धेत 90.57 मीटरचं वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्याच्या प्रयत्नात होता. पण तो सर्वाधिक 87.58 मीटर लांब इतकाच भाला फेकू शकला. मात्र इतरांच्या तुलनेत हे अंतर सर्वाधिक असल्याने त्याने सुवर्णपदक पटकावलं. या अप्रतिम प्रदर्शनानंतर बोलताना तो म्हणाला, ‘‘भालाफेकमध्ये टेक्निकही अत्यंत महत्त्वाची असते. बऱ्याच काळाच्या मेहनतीवर सर्व अवंलबून असतं. त्यामुळे आता यानंतर माझ लक्ष्य 90 मीटरचं अंतर पार करणं आहे. मी यंदा केवळ ऑलिम्पिकवर लक्ष्य ठेवून होतो. आता मी इतरही स्पर्धांची प्रॅक्टिस करुन त्यातही चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मी भारतात परतल्यावर परदेशातील स्पर्धांमध्ये सहभागासाठी VISA मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.’’

असं मिळवलं नीरजनं सुवर्णपदक

भालाफेकीत नीरज चोप्राने सुरुवातच धडाकेबाज केली. नीराजने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मी इतका भालाफेक केला. दुसऱ्या वेळी त्याने 87.58 मी इतका लांब भाला फेक करुन आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं. तिसऱ्या थ्रोमध्ये 76.79 मीटर थ्रो फेकला तरी अद्यारपही त्याची आघाडी कायम होती. त्यानंतर त्याचा चौथा आणि पाचवा थ्रो फाऊल ठरला. पण त्याने सहाव्या प्रयत्नाआधीत सुवर्णपदक खिशात घातलं होतं. त्यामुळे नीरजचा 84 मीटर लांबीचा सहावा थ्रो केवळ औपचारिकता ठरली. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं.

इतर बातम्या

सोनेरी भालाफेक करणाऱ्या नीरज चोप्राचं ‘मराठा’ कनेक्शन माहित आहे का? भालाफेक तर रक्तात

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधीच्या रोख रकमेसह गाडी आणि बरंच काही

Video: जेव्हा टोकियोच्या मैदानावर तिरंगा फडकला, राष्ट्रगीतानं मैदान दुमदुमलं, पहा गोल्डन बॉय नीरजचा भावूक क्षण

(Neeraj chopra set new target of 90 meter javelin throw after winning Gold medal in tokyo olympic)