Tokyo Olympic 2021 : यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन केले. सात पदक मिळवलेल्या भारतीय खेळाडूंनी हॉकीमध्येही कांस्य पदक मिळवलं. भारतीय पुरुष हॉकी संघाने तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत जर्मनीला 5-4 ने मात देत कांस्य पदकावर नाव कोरलं. या विजयानंतर भारतीयांमध्ये एक वेगळाच आनंद दिसत आहे. काहींनी तर क्रिकेट विश्वचषकापेक्षा हा मोठा विजय असल्याच म्हटलं होत. तब्बल 41 वर्षानंतर मिळवलेल्या हॉकीतील पदकामुळे खेळाडूंवर देशभरातून कौतुका आणि बक्षिसाचा वर्षाव होत होता. हा वर्षाव अजूनही थांबला नसून ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी त्यांच्या राज्यातील ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघात असणाऱ्या खेळाडूंना रोख रकमेचे बक्षिस दिले.
भारतीय पुरुष संघातील सदस्य बीरेंद्र लाकड़ा आणि अमित रोहिदास यांना प्रत्येकी 2.50 कोटी तर महिला संघातील दीप ग्रेस एक्का आणि नमिता टोप्पो यांना प्रत्येकी 50 लाख रुपये देत त्यांचा सन्मान केला. पटनायक यांनी कलिंगा स्टेडियममध्ये हा सन्मान समारोह ठेवला होता. यावेळी त्यांनी लाकड़ा आणि रोहिदास यांना राज्य पोलिस विभागात पोलिस उपाधीक्षक हे पद देखील बहाल केलं.
संघानी मुख्यमंत्र्यांना दिली जर्सी भेट
भारतीय पुरुष संघातील खेळाडू लाकड़ा याने मुख्यमंत्री पटनायक यांना भारतीय हॉकी संघाची जर्सी भेट म्हणून दिली. यावर सर्व खेळाडूंचे हस्ताक्षर होते. तर महिला खेळाडू एक्का हिने महिला संघाची स्वाक्षरी असणारी जर्सी पटनायक यांना भेट दिली.
89 इनडोर स्टेडियम बनवणार
यंदा टोक्यो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघानी अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळे ओडिसा सरकारने सोमवारीच 693.35 कोटी रुपयांचा निधी बाजूला काढून राज्यातील विविध शहरांमध्ये 89 इनडोर स्टेडियम बनवणार असल्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्य मंत्रिमंडळांच्या बैठकीत याबाबतची माहिती दिली होती.
हे ही वाचा :
Tokyo Olympic 2021 : ‘तू इतिहास लिहिलासं’, भारतीय हॉकी संघाच्या कर्णधाराचं पंतप्रधानांकडून कौतुक
(odisha CM Naveen patnaik honored hockey players of Odisha with two point five crore rupees each men player)