Tokyo Olympic 2021 : ‘तू इतिहास लिहिलासं’, भारतीय हॉकी संघाच्या कर्णधाराचं पंतप्रधानांकडून कौतुक, पाहा व्हिडीओ

| Updated on: Aug 05, 2021 | 1:22 PM

ऑलिम्पिक हॉकी स्पर्धेतील सर्वात तगडा संघ असणाऱ्या भारताला 1980 नंतर एकही पदक जिंकता आलं नव्हतं. पण हा 41 वर्षांचा दुष्काळ अखेर संपला असून भारतीय पुरुषांनी कांस्य पदक मिळवलं आहे.

Tokyo Olympic 2021 : तू इतिहास लिहिलासं, भारतीय हॉकी संघाच्या कर्णधाराचं पंतप्रधानांकडून कौतुक, पाहा व्हिडीओ
पंतप्रधान मोदींकडून भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन
Follow us on

Tokyo Olympic 2021 : तब्बल 41 वर्षानंतरचा वनवास संपला…भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला…टोक्यो ऑलिम्पकमध्ये (Tokyo Olympic 2021) कांस्य पदकासाठी जर्मनीशी झालेल्या सामन्यात भारताने 5-4 विजय मिळवला आहे. या विजयानंतर संपूर्ण देशभरातून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील भारतीय संघाशी विशेषत: कर्णधार मनप्रीत सिंगशी (Manpreet Singh) बातचीत करत त्याचं कौतुक केलं आहे.

मोदी यांनी विजयानंतर भारतीय हॉकी संघातील खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक यांच्याशी बातचित केली. यावेळी त्यांनी कर्णधार मनप्रीतचं विशेष कौैतुक करत ‘तू इतिहास लिहिलास’ अशा शब्दात त्याचं कौतुक केलं. तसेच बेल्जियमविरुद्ध पराभवानंतर शांत झालेला मनप्रीत आज मात्र जोशपूर्ण दिसून आला असंही मोदी यांनी नमूद केलं. त्यांनी इतर खेळाडूंशी देखील बातचीत करत त्यांचही अभिनंदन केलं.

असा रचला भारताने इतिहास

सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल करत जर्मनीने भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. पण भारत आत्मविश्वासने खेळत होता. पहिल्या क्वार्टरनंतर जर्मनीला -1-0 ने आघाडी मिळाली. म्हणजेच पहिल्या क्वार्टरवर जर्मनीचं वर्चस्व राहिलं. दुसऱ्या क्वार्टरमध्ये सुरुवातीलाच भारताच्या सिमरनजीतने एक गोल करत जर्मनीशी बरोबरी केली. पण नंतर पुन्हा जर्मनीने दोन करत भारताला बॅकफूटला ढकललं. पण जर्मनीच्या दोन गोलनंतरही भारतीय संघ तसूभरही मागे हटला नाही. भारताने जिद्द न सोडता आपला खेळ दिमाखात सुरु ठेवला.

प्रत्येक भारतीय खेळाडूच्या मनात आज आत्मविश्वास ठासून भरला होता. मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा घ्यायचा हे भारतीय संघाने ठरवलं होतं. त्यानुसार हार्दिक सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत जर्मनीची आघाडी कमी केली. तसंच हरमनप्रीतने पुन्हा गोल करत जर्मनीशी बरोबरी केली. म्हणजेच तिसऱ्या क्वार्टरमध्ये एकूण 5 गोल झाले.

आणि 41 वर्षानंतरचा तो ऐतिहासिक क्षण आला…!

काहीही करुन आजचा सामना जिंकायचाच, असा निश्चय भारतीय संघाने केला होता. त्यानुसार तिसऱ्या क्वार्टरची सुरुवात भारतीय संघाने जबरदस्त केली. सामन्याच्या 29 व्या मिनिटाला रुपिंदर सिंगने गोल केला. तिथंच भारताला आघाडी मिळाली. लगेचच 5 मिनिटांनी सिमरनजीतने गोल करुन भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जर्मनीने पेनल्टी कॉर्नर मिळवले पण त्याचं गोलमध्ये रुपांतर करण्यास जर्मनीला अपयश आलं. सरतेशेवटी कांस्य पदकाच्या सामन्यात भारताने जर्मनीला 5-4 ने पराभूत करुन 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला.

 

हे ही वाचा :

Tokyo Olympic 2020 : ‘चक दे इंडिया’, 41 वर्षानंतर हॉकीमध्ये पदक, भारताचा जर्मनीवर 5-4 ने विजय

(PM modi congratulate indian hockey team and his captain manpreet sing after winning bronze medal)