Tokyo Olympics 20-2021 : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) चीनी ताइपेच्या खेळाडू विरुद्ध सेमीफायनलचा सामना गमावत सुवर्णपदकासह रौप्य पदक मिळवण्याची संधीही गमावली होती. मात्र तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात सिंधूने दमदार पुनरागमन करत सामना दोन सरळ सेट्समध्ये जिंकला. तिने जगातील सध्या 9 व्या क्रमांकावर असणाऱ्या ही बिंगजियाओ (He Bingjiao) हिला पहिल्या सेटमध्ये 13-21 आणि दुसऱ्या सेटमध्ये 15-21 ने नमवत कांस्य पदक पटकावलं.
#TeamIndia | #Tokyo2020 | #Badminton
Women’s Singles Bronze Medal MatchYou did it @Pvsindhu1???
Back to back Olympic medals for PV Sindhu! Defeats Bing Jiao to be the 2nd Indian athlete to win 2 individual #Olympics medals. #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/YfXDvPTpzg— Team India (@WeAreTeamIndia) August 1, 2021
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने या विजयासह इतिहास रचला आहे. ऑलिम्पिकमध्ये व्यक्तीगत स्पर्धेत दोन पदक जिंकणारी सिंधू पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तर दिग्गज पैलवान सुशील कुमार (Sushil Kumar) नंतर अशी कामगिरी करणारी दुसरी भारतीय ठरली आहे. सिंधूने याआधी 2016 च्या रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवलं होतं. त्यानंतर यावर्षी कांस्यपदक मिळवत सिंधूच्या कारकिर्दीत आणखी चारचाँद लागले आहेत. याआधी वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्यपदक पटकावले होते. त्यामुळे भारतासाठी यंदाच्या ऑलिम्पिकमधलं हे दुसरं पदक असून बॉक्सर लवलीनानेही किमान कांस्य पदक निश्चित केलं आहे.
सिंधूने पहिल्या गेममध्ये सुरुवातीला 5-2 ची आघाडी घेत सामन्याची सुरुवात केली. चीनच्या खेळाडूने देखील पुनरागमन करत काही पॉइंट्स घेत बरोबरी साधली. मध्यातरापर्यंत 11-8 ची आघाडी सिंधूकडे होती. ज्यानंतर तिने तुफान खेळी करत 21-13 च्या फरकाने सेट जिंकत सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली.
दुसऱ्या सेटच्या सुरुवातीपासून दोन्ही खेळाडू चुरशीची टक्कर देत होत्या. पण सिंधूने आपला चांगला खेळ कायम ठेवत 11-8 ची आघाडी घेतली. पण प्रतिस्पर्धी हीने देखील पुनरागमन करत 11-11 ची बरोबरी साधली. त्यानंतर 15-11 ची आघाडी घेत सिंधूने पुन्हा सामन्यात आघाडी घेतली. ज्यानंतर बिंगजियाओच्या सर्व प्रयत्नांना अयशस्वी करत अखेरचा दुसरा सेटही सिंधूने 21-15 ने जिंकत सामन्यातही विजय मिळवला. या विजयासह सिंधूने कांस्य पदकही खिशात घातला.
इतर बातम्या:
Tokyo Olympics 2021: बॉक्सर लवलीनाचं पदक निश्चित, सेमीफायनलमध्ये टर्कीच्या बॉक्सरशी भिडणार
(PV Sindhu Won bronze medal in Tokyo Olympics by defeating He Bingjiao)