मुंबई : एखादा हिरो परदेशी जातो, तिथं दुश्मनांना चित करतो आणि विजयी होऊन तो परत येतो. इथं आला तर त्याच्या स्वागतासाठी गाणा बजाणा सर्व काही ठेवलं जातं. मैफिल सजतात, पोवाडे गायले जातात, मनोरंजन म्हणून डान्सही असतो. काही नर्तकी स्पेशल असतात. हे सगळं एखाद्या फिल्ममध्ये घडत असल्यासारखं वाटत असलं तरी ते प्रत्यक्षात घडलंय. हा हिरो आहे अर्थातच टोकियो ऑलंपिक गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि त्याच्या स्वागतासाठी त्याच्यासमोर ही डान्सची मजा मस्ती केलीय रेडीओ आरजे मलिश्कानं (RJ Malishka). यात फक्त मलिश्का एकटी नाही. तिच्यासोबत तिच्या मैत्रिणी, सहकारींचा ग्रुपही आहे. गाणं लागलेलं आहे उडे जब जब झुल्फे तेरी.
या व्हिडीओमध्ये भारताचा भालाफेक चॅम्पियन नीरज हा झुम मीटींगवरुन आरजे मलिश्कासोबत जोडला गेलेला आहे. यावेळी मलिश्का आणि तिच्या मैत्रीणीं नीरजच्या स्वागतासाठी डान्स करत आहेत. यावेळी नीरजही हसत खेळत ह्या सगळ्यांची मजा घेतोय. नीरजचं भारतात अनेक ठिकाणी अनेक प्रकारे स्वागत झालं, पण हे असं हटके स्वागत मलिश्काच करु शकते. तर हा हटके स्वागताचा व्हिडीओही मलिश्कानं ट्वीटरवर पोस्ट केला असून तुम्हीही पाहा…
Ladiesssss..Yes I got the hard hitting, deep answers too but..Take the first 4 secs before the cam moves to the zoom call to guess who we are dancing for? 😉 #udejabjabzulfeinteri and then tell me I did it for all of us? #gold #olympics #neerajchopra @RedFMIndia @RedFM_Mumbai pic.twitter.com/SnEJ99MK31
— Mumbai Ki Rani (@mymalishka) August 19, 2021
ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत उत्कृष्ट असा 87.58 मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरजवर संपूर्ण देशातूंन कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोबतच त्याला कोट्यवधींची बक्षिसंही जाहीर झाली असून यात रोख रकमेसह, गाडी, घर बनवण्यासाठी मोफत सिंमेट, मोफत हवाईयात्रा अशी अनेक बक्षिसं आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आणि सीएसके संघाने नीरजला एक कोटी रुपये रोख रकम बक्षिस म्हणून दिली आहे. तर इंडिगो एअरलाईन्सने देखील नीरजला सुवर्णपदक विजयानंतर एक वर्षापर्यंत मोफतमध्ये अनलिमिटेड विमान प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.
गुरुग्राम येथील एका रिअल इस्टेट कंपनीने नीरजला 25 लाख रुपये बक्षिस जाहीर केलं आहे. याशिवाय बांगड़ सिमेंट कंपनीने घर बांधण्यासठी मोफत सिमेंटची घोषणा देखील केली आहे.नीरज चोप्राला महिंद्रा ग्रुपतर्फे नुकतीच मार्केटमध्ये आलेली कार XUV700 देण्याची घोषणा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत केली. या सर्वांसह हरियाणा सरकारने 6 कोटी रुपयांचं बक्षीस आणि क्लास वन दर्जाची नोकरी नीरजला देऊ केली आहे. पंजाब आणि मणिपुर सरकारनेही नीरजला बक्षिसाची घोषणा केली आहे.
इतर बातम्या
सोनेरी भालाफेक करणाऱ्या नीरज चोप्राचं ‘मराठा’ कनेक्शन माहित आहे का? भालाफेक तर रक्तात
सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधीच्या रोख रकमेसह गाडी आणि बरंच काही
(RJ Malishka and her friends dances infront of neeraj chopra on zoom meeting)