बेसल : टोक्यो ऑलम्पिकची (Tokyo Olympics 2021) तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून सर्व प्रकारच्या खेळातील खेळाडूंच्या पात्रता फेऱ्याही पार पडल्या आहेत. दरम्यान टेनिस स्पर्धेमध्ये दिग्गज टेनिसपटू खेळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून असताना नुकताच विम्बल्डन जिंकलेल्या नोव्हाकने अद्याप निर्णय़ झाला नसल्याचे सांगितले. तर दुसरीकडे स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर (Roger Federer) यानेही टोक्यो ऑलम्पिकमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. फेडररने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. (Swiss Tennis Star Roger Federer Pulls Out of Tokyo Olympics 2021 due to Knee Injury)
फेडररने गुढघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याचे सांगितले आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या ग्रँड स्लॅम विम्बल्डन स्पर्धेतही
क्वॉर्टर फायनलमध्ये पोलंडच्या हुबर्ट हुरकाज याने 6-3, 7-6 (7/4), 6-0 अशा तीन सेट्समध्ये रॉजरला नमवत स्पर्धेबाहेर केले होते. फेडरर याने लंडनच्या ऑलम्पिक 2012 मध्ये रौप्य पदक पटकावले होते. तसेच बीजिंग ऑलम्पिक 2008 मध्येही युगल वर्गात त्याने सुवर्ण पदक पटकावलं होतं.
फेडरर म्हणाला, “ग्रास कोर्टावर खेळताना दुर्देवाने माझ्या गुडघ्याला दुखापत धाली. त्यामुळे टोक्यो ऑलम्पिकमधून मी माघार घेत आहे. मी ऑलम्पिकमध्ये माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करु शकणार नसल्याने मी निराश आहे. मी सध्या पुढील स्पर्धांसाठी तयारीच्या दृष्टीने सराव करत आहे आणि संपूर्ण स्वित्झर्लंड संघाला माझ्याकडून शुभेच्छा.”
— Roger Federer (@rogerfederer) July 13, 2021
फेडररच्या आधीच दिग्गज खेळाडू राफेन नदाल (Rafeal Nadal) आणि महिलाी चॅम्पियन सेरेना विल्यम्स (Serena Williams) यांनीही
टोक्यो ऑलम्पिकमधून माघार घेतली आहे.
हे ही वाचा :
Tokyo Olympics 2020 मध्ये खेळण्याबाबत नोव्हाक जोकोविच याचे मोठे वक्तव्य, म्हणाला…
(Swiss Tennis Star Roger Federer Pulls Out of Tokyo Olympics 2021 due to Knee Injury)