Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics-2020) भारताने दोन पदकं मिळवली असून तिसरं पदक पक्कं केलं आहे. भारताची बॉक्सर लवलीना बोरगोहेनने (Lovlina Borgohain) उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश केल्यामुळे बॉक्सिंगच्या नियमांनुसार तिला किमान कांस्य पदक मिळाणार आहे. पण या पदकाला रौप्य किंवा सुवर्ण करण्यासाठी आज ती सेमीफायनलचा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.
काही वेळात सुरु होणाऱ्या लवलीनाच्या सामन्यासाठी संपूर्ण भारत देश उत्सुक असून लवलीनाचं राज्य असणाऱ्या आसाममधील सर्व आमदारही तिचा सामना पाहणार आहेत. ज्यासाठी विधानसभेचं कामकाज अर्धा तास थांबवण्यात येण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार आसाम विधानसभेच्या स्पीकर डॉ. नुमाल मोमिन यांनी सांगितलं की, कामकाज काही काळ थांबवण्याचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांना दिला आहे.
भारतासाठी ऑलिम्पिक पदक निश्चित करणारी लवलीना आधीपासून बॉक्सर नव्हती. ती आधी किक बॉक्सिंग करायची. तिच्या दोन मोठ्या बहिनी लीमा आणि लीचा या देखील किक बॉक्सर आहेत. त्यामुळे तिनेही किक बॉक्सिंग खेळायला सुरुवात केली होती. पण नंतर तिला खास कामगिरी करता न आल्याने तिने SAI ने ठेवलेल्या बॉक्सिंग ट्रायलमध्ये भाग घेतला. लवलीनाने 2012 पासून बॉक्सिंगची ट्रेनिंग सुरु केली. त्यानंतर मागील 9 वर्षांच्या मेहनतीची फळ तिला आज मिळाले आहे.
इतर बातम्या:
Tokyo Olympics 2021: बॉक्सर लवलीनाचं पदक निश्चित, सेमीफायनलमध्ये टर्कीच्या बॉक्सरशी भिडणार
Tokyo Olympics 2021: भारताला मोठा झटका, मेरिकोमचा पराभव; ऑलम्पिकमधील दुसऱ्या पदकाच्या आशा संपल्या
(To watch boxer lovlina borgohain semi final match assam assembly proceedings postponed for half hour)