Tokyo Olympic 2020 टोकियो : भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याच्या खेळीकडं भारताच्या नजरा लागल्या होत्या. करोडो भारतीयांचं स्वप्न नीरजनं पूर्ण करत टोकियो ऑलम्पिकमधील पहिलं सुवर्ण पदक भारताला मिळवून दिलं आहे. पहिल्या राऊंडमध्ये 87.03 मीटर लांब भाला फेक करत त्यानं आघाडी मिळवली. नीरज चोप्रा भारताला यंदाच्या ऑलंम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून देतो का याकडं सर्वांच लक्ष लागलं होतं, अखेर करोडो भारतीयांचं स्वप्न नीरज चोप्रानं पूर्ण केलं आहे. दुसऱ्या राऊंडमध्ये नीरज चोप्रानं 87.58 मीटर एवढ्याअंतरावर थ्रो फेकला आहे.पहिल्या दोन फेऱ्यांपासून नीरज चोप्रा आघाडीवर होता. दुसऱ्या फेरीत नीरज चोप्रानं फेकलेल्या थ्रोची आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. टोकिओ ऑलिम्पिकमधील आणि भालाफेकीत मिळणारं हे भारतातील पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे.
भालाफेकीत नीरज चोप्राची धडाकेबाज सुरुवात केली. नीराज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मी इतका भालाफेक केला. फायनलमध्ये तो अशीच दमदारी कामगिरी करुन, आज तो पदक मिळवतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. नीराज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मी इतका भालाफेक केला. दुसऱ्या फेरीत नीरज चोप्राने 87.58 मी इतका लांब भाला फेक करुन आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं. नीरज चोप्रानं तिसऱ्या थ्रोमध्ये 76.79 मीटर थ्रो फेकला. तर, नीरज चोप्राचा चौथा थ्रो फाऊल ठरला. नीरजनं टाकलेला पाचवा थ्रो देखील फाऊल ठरला आहे. सहाव्या फेरीत नीरजनं 84 मीटर थ्रो फेकला. टोकिओ ऑलिम्पिकमधील आणि भालाफेकीत मिळणारं हे भारतातील पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे.
नीरज चोप्रा हा हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावातील आहे. भालाफेक या खेळाची कोणतीही पार्श्वभूमी त्याच्या गावात नवह्ती. सुरुवातीच्या काळात नीरज चोप्रा इतरांप्रमाणं क्रिकेट खेळत होता. नीरज चोप्रानं मार्च 2021 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस पटियाळा येथे 88.07 मीटर इतक्या अंतरावर भाला फेकला होता. 2018 मध्ये नीरज चोप्रानं आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. त्यावेळी त्यानं 88.06 मीटर भाला फेकला होता.
हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांकडून 6 कोटी जाहीर
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरज चोप्रा याचं अभिनंदन केलं आहे. हरियाणा सरकारच्या वतीनं 6 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. नीरज चोप्राची इच्छा असल्यास त्याला क्लास वन दर्जाची नोकरी देऊ, अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे.
Indian Javelin thrower Neeraj Chopra creates History !
Neeraj Chopra wins Gold Medal at #TokyoOlympics
Well done Neeraj, entire country is proud of you.
Congratulations!#Cheer4India pic.twitter.com/Xok1drYIzw
— Ministry of Railways (@RailMinIndia) August 7, 2021
नीरज चोप्राचा जन्म हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावातील एका शेतकरी कुटुंबात 24 डिसेंबरला जन्म झाला होता. नीरजनं त्याचं शिक्षण चंदीगढ येथे पूर्ण केलं. 2016 मध्ये पोलंड येथे झालेल्या 20 वर्षा खालील आयएएएफ जागतिक वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. यानंतर नीरज चोप्राची इंडियन आर्मीत ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर म्हणून नियुक्ती देण्यात आली होती.
नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन
History has been scripted at Tokyo! What @Neeraj_chopra1 has achieved today will be remembered forever. The young Neeraj has done exceptionally well. He played with remarkable passion and showed unparalleled grit. Congratulations to him for winning the Gold. #Tokyo2020 https://t.co/2NcGgJvfMS
— Narendra Modi (@narendramodi) August 7, 2021
नीरज चोप्रानं मिळवलेलं सुवर्णपदक कायम लक्षात ठेवलं जाईल. टोकियोमध्ये इतिहास लिहीला गेला. त्यानं अतुलनीय खेळ केला. सुवर्णपदक मिळवल्याबद्दल अभिनंदन, असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे.
भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रा यानं सुवर्णपदक जिंकल्यानंतर तब्बल 13 वर्षानंतर नीरज चोप्रानं भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. नीरजच्या पदकामुळे भारताला टोकियो ऑलम्पिकमध्ये 7 पदकं मिळाली आहेत. नीरज चोप्रा 1 सुवर्णपदक, मीराबाई चानू आणि रविकुमार दहिया याला रौप्य पदक, भारतीय पुरुष हॉकी टीम, लवलीना, बजरंग पुनिया, पी. व्ही. सिंधू यांनी कांस्य पदकं मिळवली आहेत.
इतर बातम्या:
VIDEO : Bajrang Punia : पैलवान बजरंग पुनियाला कुस्तीत कांस्यपदक, कझाकिस्तानच्या पैलवानावर 8-0 ने मात