Tokyo Olympic 2020 : टोकियो ऑलिम्पिकमधल्या हॉकीच्या सेमीफायनच्या रोमहर्षक सामन्यात बेल्जियमने भारताचा 5-2 ने पराभव केला आहे. बेल्जियमने भारताचा 5-2 असा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला. भारतीय संघाचं सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. मात्र, तरीही संघ कांस्यपदकाचा दावेदार आहे.
बेल्जिअमने सामन्याच्या सुरुवातीपासून भारताला दडपणाखाली खेळायला लावलं. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला बेल्जिअमने गोल केला. भारतानेही लगोलग गोल करुन बेल्जिअमशी बरोबरी केली. लगोलग भारताने दुसरा गोल केला. पण त्यानंतर बेल्जियमने भारताला गोल करुच दिला नाही. बेल्जिअमचा संघ प्रत्येक वेळी भारताला वरचढ ठरला. भारताने बेल्जियमशी दोन हात करण्याच्या चांगला प्रयत्न केला. पण अखेर बेल्जिअमने भारताचा 5-2 असा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला. भारताला आता कांस्य पदकासाठी खेळावं लागणार आहे.
भारतीय संघाचं सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. मात्र, तरीही संघ कांस्यपदकाचा दावेदार आहे. भारताने पहिल्या हाफमध्ये चांगला खेळ केला. तर बेल्जियम शेवटच्या क्वार्टरमध्ये भारताला खूपच वरचढ ठरला. पेनल्टी कॉर्नर हे भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे.
भारताला आता कांस्य पदकासाठी खेळावं लागणार आहे. भारतीय संघ कांस्यपदकासाठी जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पराभूत संघाचा सामना करेल. सेमी फायनलमध्ये विजय मिळवता आला नाही पण आता भारतीय संघाने कांस्य पदक तरी जिंकावं, अशीच अपेक्षा भारतीय फॅन्स करत आहेत.
(Tokyo olympic 2020 live update belgium Hockey team defeated India 5-2)