टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेचा (Tokyo olympic 2020) आज तिसरा दिवस आहे. भारतानं दुसर्या दिवशी वेटलिफ्टर मीराबाई चानूच्या रौप्यपदकासह आपल्या पदकाचं खातं उघडलं. आजही भारत अनेक खेळात भाग घेईल. दिवसाची सुरुवात चांगली झाली नाही स्टार खेळाडू मनु भाकर (manu Bhakar) आणि यशस्विनी देसवाल (Yashswini Deswal) 10 मीटर एअर पिस्टलच्या अंतिम फेरीत प्रवेश करू शकले नाहीत.
रविवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये मेरी कोम, पीव्ही सिंधू आणि जी साथियानसारखे स्टार खेळाडू मैदानात एन्ट्री करतील. भारतीय खेळाडू बॅडमिंटन, हॉकी, बॉक्सिंग, नेमबाजी, टेबल टेनिस, टेनिस आणि स्विमिंग यामधील आपलं कौशल्य दाखवतील आणि प्रतिस्पर्ध्यांसाठी मोठं आव्हान उभं करतील. याशिवाय, सेलिंग, नौकाविहार, कलात्मक जिम्नॅस्टिक आणि स्विमिंगमध्येही भारत आपला दम दाखवणार आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघाने टोक्यो ओलिम्पिक 2020 मध्ये पहिल्या सामन्यता न्यूझीलंडवर विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र पराभव पत्करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने दमदार खेळ दाखवत भारतावर 7-1 च्या फरकाने विजय मिळवला आहे. भारताकडू दिलप्रीत सिंगने एकमेव गोल केला.
Not a great day at work for the #MenInBlue, but this will pump us to come back a lot stronger! ?#INDvAUS #HaiTayyar #IndiaKaGame #TokyoTogether #StrongerTogether #Tokyo2020 #HockeyInvites #TeamIndia #Hockey pic.twitter.com/xdnJpUvivu
— Hockey India (@TheHockeyIndia) July 25, 2021
सामन्यात अखेर भारताने आपलं खातं खोललं आहे. पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताने सामन्याची 4-1 ची अशी गुणसंख्या केली आहे. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये दिलप्रीत सिंगने गोल केला आहे.
34′ INDIA GET ONE BACK! ?
India’s continuous press bears fruit as Dilpreet Singh manages to beat the Australian defence with a powerful shot. ?
?? 1:4 ??#INDvAUS #HaiTayyar #IndiaKaGame #TokyoTogether #StrongerTogether #Tokyo2020 #HockeyInvites #TeamIndia #Hockey pic.twitter.com/6XN9elwMKA
— Hockey India (@TheHockeyIndia) July 25, 2021
भारत आणि ऑस्ट्रेलिया पुरुष हॉकी संघातील सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत तब्बल 4 गोल्सची आघाडी घेतली आहे. तर भारताला अजून खातेही खोलता आलेले नाही.
Not a great start to the match, but the #MenInBlue have another 30 minutes to forge a comeback.
Let’s do it, #TeamIndia! ?#INDvAUS #HaiTayyar #IndiaKaGame #TokyoTogether #StrongerTogether #Tokyo2020 #HockeyInvites #TeamIndia #Hockey pic.twitter.com/3qsnNrodJg
— Hockey India (@TheHockeyIndia) July 25, 2021
मेरी कोमने दिवसातील पहिला बॉक्सिंग सामना जिंकल्यानंतर पुरुष बॉक्सर मनीष कौशिक ही रिंगमध्ये उतरला. मात्र त्याला मेरीप्रमाणे विजय मिळवता आला नाही आणि 63 किलोग्राम वजन गटात राउंड 32 मध्येच त्याचा पराभव झाला. मनीषला ब्रिटनच्या ल्यूक मॅकोरमॅक याने 4-1 च्या फरकाने पराभूत केलं. शनिवारी बॉक्सर विकास कृष्ण पराभूत झाल्यानंतर आता मनीषलाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Our 1⃣1⃣ to fight it out. ?
Thoughts on our lineup ? Australia?#INDvAUS #HaiTayyar #IndiaKaGame #TeamIndia #TokyoTogether #TokyoOlympics #Tokyo2020#Cheer4India #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/jIYp7CjJ7W
— Hockey India (@TheHockeyIndia) July 25, 2021
भारत आणि ऑस्ट्रेलिया पुरुष हॉकी संघात सामना सुरु आहे. भारताने पहिला सामना न्यूझीलंड विरुधात जिंकल्यानंतर आज दुसरा सामना खेळत आहे.
मेरीकॉमने राउंड ऑफ 32 मध्ये विजय मिळवत टोक्यो ऑलिम्पक स्पर्धेचा श्रीगणेशा केला आहे. तिने सामना 4:1 च्या फरकाने जिंकला. सामन्याच उत्कृष्ठ असा बचावात्मक खेळ दाखवत मेरीने विजय मिळवला. या शानदार विजयामुळे मेरीकडून पदकाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
2012 London #Olympics bronze medalist @MangteC defeats M Hernandez by 4-1 to advance further in women’s 51 kg event.#PunchKaDum ? #Cheer4India ???? pic.twitter.com/eULbrzTjHA
— Dept of Sports MYAS (@IndiaSports) July 25, 2021
टेबल टेनिस स्टार मनिका बत्राने महिला एकेरीमध्ये दुसऱ्या फेरीत विजय मिळवत तिसरी पेरी गाठली आहे. मनिकाने शानदार खेळ दाखवत सामना जिंकला. आधी 2-0 ने पिछाडीवर असणाऱ्या मनिकाने पुनरागमन करत 4-3 ने सामना जिंकला. मनिकाने यूक्रेनच्या पेस्तोस्का हिला 4-11,4-11,11-7,12-10,8-11,11-5,11-7 च्या फरकाने मात दिली.
.@manikabatra_TT secures victory against higher-ranked Ukraine’s Pestoska in a thrilling 7-setter in her 2nd round singles #tableTennis match.
We wish her all the best for the next round!#Cheer4India pic.twitter.com/UhLZ4Fk65l
— SAIMedia (@Media_SAI) July 25, 2021
भारताची आघाडीची टेबल टेनिस स्टार मनिका बत्राने दुसराही गेम 12-10 च्या फरकाने जिंकत सामन्यात 2-2 से बरोबरी साधली आहे.
भारताची आर्टिस्टिक जिमनास्ट प्रणती नायक ऑल राउंड फाइनल्ससाठी पात्रता फेरी पार करु शकली नाही. चारही कॅटेगरीमध्ये मिळून तिचा स्कोर 42.565 इतकाच होता. ती दुसरे सबडिविजनमध्ये 29 व्या रँकवर होती. दरम्यान टॉप 24 खेळाडूच ऑलराउंड फायनलमध्ये जात असल्याने प्रणती स्पर्धेबाहरे गेली आहे.
भारताचा टेबल टेनिसपटू जी साथियान पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पराभूत होऊन स्पर्धेबाहेर गेला आहे. त्याला हाँगकाँगच्या लॅम सियू हँगने रोमहरर्षक सामन्यात 4-3 च्या फरकाने मात दिली. साथियान सामन्यात 3-1 ने पुढे असताना शेवटच्या तिन्ही राउंडमध्ये पराभूत झाला. हँगने 11-7,7-11, 4-1, 5-11, 11-9, 11-10, 11-6 च्या फरकाने सामना जिंकला.
#Tokyo2020 #TableTennis
Men’s singles@sathiyantt defeated by #SiuHangLam #Cheer4India #TeamIndia pic.twitter.com/3z9nCktJrq— Doordarshan Sports (@ddsportschannel) July 25, 2021
चार सीरीजनंतर भारतीय निशानेबाज दीपक कुमार आणि दिव्यांश हे टॉप 30 मध्ये पोहोचले आहेत. पण फायनल राउंड असून दूर आहे.
दिव्यांश -102.9, 103.7, 103.6, 104.6
दीपक कुमार – 102.9, 103.8, 103.7,105.2
OLYMPIC HISTORY HAS BEEN MADE.
Japan’s Yuto Horigome wins the first-EVER Olympic gold medal in skateboarding. #TokyoOlympics pic.twitter.com/6vCN6XpSc9
— #TokyoOlympics (@NBCOlympics) July 25, 2021
सध्या भारत शूटींग स्पर्धेमध्ये खेळत असून दीपक आणि दिव्यांश हे भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. यावेळी दोघांनी सुमार प्रदर्शन दाखवले आहे. दोन सीरीजनंतर दीपक 34 आणि दिव्यांश 36 व्या क्रमांकावर आहे. दीपकची सरासरी 10.3 तर दिव्यांशची 10.2 आहे.
A stunning victory for Team Spain ?? ?@sara_sorribes knocks out world No.1 Ash Barty in straight sets. #Olympics • #Tennis • #Tokyo2020 pic.twitter.com/wP17QEOgfd
— #AusOpen (@AustralianOpen) July 25, 2021
सानिया मिर्झा आणि अंकिता रैनाची जोडी पहिल्या फेरीत आधीच बाहेर पडली आहे. त्यांनी युक्रेनियन जोडीविरुद्ध पहिला सेट 6-0 ने जिंकला. यानंतर युक्रेनियन जोडीने पुढील दोन सेट 7-6,8-10 जिंकून सामना जिंकला.
Andy Murray’s reason for his withdrawal from singles at the Olympics: quad strain.
“The medical staff have advised me against playing in both events, so I have made the difficult decision to withdraw from the singles and focus on playing doubles with Joe.”
More tough luck.
— Tumaini Carayol (@tumcarayol) July 25, 2021
ऑस्ट्रेलियाच्या महिला रिले संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 4 × 100 मीटर फ्रीस्टाईल (जलतरण) मध्ये देशाचे पहिलं सुवर्णपदक जागतिक विक्रमासह जिंकलं.
सानिया मिर्झा आणि अंकिता रैनाने 21 मिनिटांत पहिला सेट 6-0 ने सहज जिंकला. सानिया-अंकिता जोडी सामन्यात 1-0 ने आघाडीवर आहेत. तत्पूर्वी, सुमित नागलने शुक्रवारी आपल्या पहिल्या सामन्यात विजयासह सुरुवात केली आहे.
?? ? ???? ?
2016 Rio Olympics ? medalist @Pvsindhu1 starts off her @Tokyo2020 campaign on a brilliant note as she comfortably beats ??’s Polikarpova 21-7, 21-10 in her first match of Group J ?#SmashfortheGlory#badminton#Tokyo2020#Cheer4India#TeamIndia pic.twitter.com/XQt6d5TjnL
— BAI Media (@BAI_Media) July 25, 2021
पीव्ही सिंधूने पहिला सामना एकतर्फी जिंकला. अवघ्या 28 मिनिटांत तिने इस्राईलच्या सेनियाचा 21-7, 21-10 असा पराभव करून सहज विजय मिळविला. आता ती मंगळवारी ग्रुप राऊंडचा पुढील सामना खेळेल.
पीव्ही सिंधूने पहिला गेम अवघ्या 13 मिनिटांत 21-7 ने जिंकला. इस्त्राईलची सेनिया जखमी झाली, त्याचा फायदा सिंधूला झाला आहे. सिंधू तिला पूर्ण कोर्टात फिरवत आहे.
पीव्ही सिंधूचा सामना गट J च्या तिच्या पहिल्या सामन्यात इस्त्रायली खेळाडूशी होत आहे. सिंधू या वेळी पदकाची मोठी आशा मानली जात आहे. ती विजयासह आपली मोहीम सुरु करण्यास इच्छुक आहे.
Manu and Deswal rank 12, 13 with 575 and 574. I think they put up a brave brave fight especially Manu, after having some problem with her equipment. I think this experience will make them stronger for the mixed team event which I’m really looking forward to now
— Heena SIDHU (@HeenaSidhu10) July 25, 2021
पुरुष स्कीटच्या पात्रता फेरीत मेराज खान आणि अंगद बाजवा यांनी चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या फेरीत मेराजने परिपूर्ण 25 गुण मिळवून पहिल्या स्थानावर आहे तर अंगद पाचव्या स्थानावर आहे. या स्पर्धेतील पहिले सहा खेळाडू अंतिम फेरीत जातील.
भारतासाठी दिवसाची पहिली चांगली बातमी. अरविंदसिंग आणि अरुण लाल यांनी लाइटवेट मेन्स डबल्स स्कलच्या रेपेचेज फेरीत 6:51:36 वेळेसह तिसरे स्थान पटकावले आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले.
तिसर्या दिवसाची खराब सुरुवात झाली आहे. भारताच्या स्टार मानू भाकर आणि यशस्विनी देसवाल यांना 10 मीटर एअर पिस्टलच्या अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. दोघीही चांगल्या लयमध्ये होत्या पण त्यांना संधीचा फायदा घेता आला नाही.