Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिक्समध्ये (Tokyo Olympics 2020) आजचा (4 ऑगस्ट) दिवस भारतासाठी ‘कभी खुशी, कभी गम’ असा राहिला. ऑलिम्पिकमधील आजच्या 12 व्या दिवशी भारताच्या काही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली पण भारतीय महिला हॉकी संघाला (Indian Women hocky team) सेमीफायनलमध्ये मात्र अर्जेंटीना संघाकडून पराभव पत्करावा लागला. दुसरीकेड लवलीनाने (Lovlina) बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक मिळवले तर कुस्तीपटू रवि दहियाने (Ravi dahiya) फायलनमध्ये पोहतच किमान रौैप्य पदक पक्के केले.
एथलेटिक्समध्ये भारताचा पदकासाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) भालाफेकमध्ये उत्तम कामगिरी करत फायनलपर्यंत मजल मारली आहे. बुधवारच्या दिवसातील भारतीय खेळाडूंचा लेखाजोखा असा राहिला –
भारताची महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेनने सेमीफायनलमध्ये पोहचत आधीच पदकं पक्क केलं होत. आज ती सेमीफायनल जिंकून पदकाचा रंग बदलेल अशी आशा होती. मात्र वर्ल्ड चॅम्पियन टर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीने तिला 5-0 ने पराभूत केलं. ज्यामुळे लवलीनाला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.
भारताचे तीन कुस्तीपटू आज मैदानात होते. यात महिला गटात अंशु मलिक 57 किलो वजनी गटात सलामीच्या सामन्यातच बेलारूसच्या इरिना कुराचिकिनाविरुद्ध पराभूत झाली. तर त्यानंतर पुरुषांमध्ये 57 किलो वजनी गटात रवि दहियाने आधी कोलंबियाच्या ऑस्कर उरबानोंला 13-2 ने नमवत क्वॉर्टर फायनल, त्यानंतर बुल्गारियाच्या जॉर्जी वालेंटिनोवला 14-4 ने मात देत सेमीफायनलमध्ये पोहचला. ज्यानंतर काजाकिस्तानच्या नुरीस्लमला धोबीपछाड करत रविने फायनमध्ये धडक घेत भारतासाठी आणखी एक पदक पक्के केले. दुसरीकडे दीपक पूनिया पुरुषांच्या 86 किलो वजनी गटात पहिल्या सामन्यात नाइजीरियाच्या एजीमोर इकेरेकेमेला 12-1 ने नमवून क्वॉर्टर फायनलमध्ये पोहचला. तिथे चीनच्या झुहेन लिनला 6-3 ने नमवत तो सेमीफायनलमध्ये पोहचला. पण त्याठिकाणी अमेरिकेच्या डेविड मॉरिस टेलरने त्याला मात दिल्याने तो आता कांस्य पदकासाठी लढणार आहे.
नीरज चोप्राने भालाफेकच्या पात्रता फेरीत 86.65 मीटर लांब थ्रो फेकत थेट फायनलचं तिकीटं मिळवलं आहे. नीरजने पात्रता फेरीत पहिले स्थान मिळवत पुढची फेरी गाठली. दुसरीकडे शिवपाल सिंह मात्र पात्रता फेरी पार करु न शकल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले.
टोक्यो ओलिम्पिकमध्ये गोल्फ खेळाची सुरुवात आज झाली. ज्यात भारताची रियो ओलिम्पिक 2016 मध्ये सहभाग घेणारी आदिति अशोक संयुक्त रूपात दुसऱ्या स्थानी आहे. पहिल्या राउंडमध्ये तिने 67 स्कोर केला. अदितिसह दीक्षा डागरही या खेळात सहभागी झाली असून ती 56 व्या स्थानावर आहे.
हे ही वाचा
Tokyo Olympics 2021: नीरज चोप्राचा ऐतिहासिक थ्रो, मिळवलं फायनलचं तिकिट, भारताला पदकाची आशा
Tokyo Olympics 2021: भारताच्या खिशात आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य पदकावर कोरलं नाव
(Tokyo Olympic day 12 womens hockey team lost semifinal ravi secure medal lovlina won bronze deepak lost in semifinal)