Tokyo Olympics 2020 Live : बॉक्सर पुजा रानी उपांत्य पूर्व फेरीत दाखल, दीपिका कुमारीही विजयी

| Updated on: Jul 28, 2021 | 6:35 PM

Tokyo olympics 2020 live update : ऑलिम्पिकमधील आज भारताचा सहावा दिवस आहे. वेटलिफ्टिंगमधील मीराबाई चानूच्या रौप्यानंतर चाहते दुसर्‍या पदकाची आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु अद्याप ही प्रतीक्षा संपलेली नाही.

Tokyo Olympics 2020 Live : बॉक्सर पुजा रानी उपांत्य पूर्व फेरीत दाखल, दीपिका कुमारीही विजयी
पुजा राणी
Follow us on

ऑलिम्पिकमधील आज भारताचा सहावा दिवस आहे. वेटलिफ्टिंगमधील मीराबाई चानूच्या रौप्यानंतर चाहते दुसर्‍या पदकाची आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु अद्याप ही प्रतीक्षा संपलेली नाही. शूटिंगमध्ये भारताला पदकाची अपेक्षा होती, परंतु आतापर्यंत भारचाच्या नशिबी निराशाच आली आहे. आज देशातील अनेक स्टार खेळाडू खेळणार आहेत. महिला हॉकी संघाने ग्रुपचा तिसरा सामना ग्रेट ब्रिटनविरुध्द 1-4 असा गमावला. त्याच वेळी, तिरंदाजीत राऊंड ऑफ 64 जिंकल्यानंतर, पुढच्या फेरीतील शुटऑफमध्ये तरुणदीप रॉय हरला. दीपिका कुमारी देशाच्या पदकाच्या आशा पूर्ण करण्यासाठी उतरेल. ऑलिम्पिकवीरांकडून देशाला मोठ्या आशा आहेत.. ते कसे कामगिरी करतात ते पहावे लागेल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Jul 2021 05:01 PM (IST)

    टेनिस : नोव्हाक जोकोविच उपांत्य पूर्व फेरीत

    सर्बियाचा स्टार टेनिस पटू नोव्हाक जोकोविच टोक्यो ओलिम्पिकच्या  पुरुष एकेरी स्पर्धेत उपांत्य पूर्व फेरीत पोहोचला आहे. त्याने स्पेनच्या एलेजांड्रो फोकिनाला 6-3 आणि 6-1 च्या फरकाने नमवला आहे.

  • 28 Jul 2021 03:23 PM (IST)

    तिरंदाजी : दीपिका कुमारीचा सलग दुसरा विजय

    भारताची आघाडीची तिरंदाज दीपिका कुमारीने तिरंदाजी स्पर्धेमध्ये सलग दुसरा उत्कृष्ट विजय मिळवत पुढची फेरी गाठली आहे. तिने अंतिम 8 मध्ये जागा मिळवली आहे.


  • 28 Jul 2021 03:16 PM (IST)

    बॉक्सिंग : पूजा रानीने सामना 5-0 ने जिंकला

    पूजा रानीने ऑलिम्पिकमधील सलामीचा सामना 5-0 ने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश मिळवला आहे. पूजा पदकापासून केवळ एक पाऊल दूर आहे. 

     

  • 28 Jul 2021 02:59 PM (IST)

    बॉक्सींग – पुजा रानीचा सामना सुरु

    पूजा रानीने उत्कृष्ठ खेळ दाखवत पहिला राउंड स्वत:च्या नावे करत सामन्यात आघाडी घेतली आहे.

  • 28 Jul 2021 02:42 PM (IST)

    तिरंदाजी – दीपिका कुमारी पहिल्या सामन्यात विजयी

  • 28 Jul 2021 01:51 PM (IST)

    तिरंदाजी – प्रवीण जाधव पराभूत

    पहिल्या फेरीत अप्रतिम विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या फेरीत मात्र प्रवीणला जगातील नंबर एकचा तिरंदाज असणाऱ्या अमेरिकेच्या एलिसन ब्राडीने जाधवला नमवत स्पर्धेबाहेर केलं.

  • 28 Jul 2021 12:51 PM (IST)

    तिरंदाजी – प्रवीण जाधव विजयी, पुढच्या फेरीत प्रवेश

    प्रवीणने दुसऱ्या सेटमध्ये गलासानवर दबाव कायम ठेवला. गलासानने 27 गुण मिळवताच प्रवीणने 28 गुण मिळवले. तिसऱ्या सेटमध्ये जाधव पुन्हा एकदा 9-9-10 च्या फरकाने 27 अंक मिळवून यशस्वी ठरला. त्याने सामना 6-0 च्या फरकाने खिशात घातला.

  • 28 Jul 2021 12:41 PM (IST)

    तिरंदाजी – पहिला सेट प्रवीण जाधवच्या नावावर

    पहिल्या सेटमध्ये प्रवीणने 28 गुण मिळवत 2-0 ची आघाडी घेतली.

    स्कोरबोर्ड

    गालसान – 10-10-07
    प्रवीण जाधव – 9-9-10

  • 28 Jul 2021 11:49 AM (IST)

    भारताचे आजचे उर्वरीत सामने

    तिरंदाजी – प्रवीण जाधव, पुरुष एकेरी (दुपारी 12:30 वाजता)

    तिरंदाजी – दीपिका कुमारी, महिला एकेरी (दुपारी 02:14 वाजता)

    बॅडमिंटन – बी साईं प्रणीत, पुरुष एकेरी(दुपारी 02:30 वाजता

    बॉक्सींग –  पुजा रानी – (दुपारी 01:33 वाजता)

  • 28 Jul 2021 11:25 AM (IST)

    सेलिंग – गणपति आणि वरुणची जोडी 18 व्या स्थानावर कायम

    आज पार पडलेल्या सेलिंग शर्यतीत भारताच्या गणपति केलपांडा आणि वरुण ठक्कर यांनी चौथ्या रेसमध्ये 19 व्या स्थानावर होते. शर्यतीच्या अंती ते 18 व्या स्थानावर होते. एकूण 12 शर्यतीतील 8 रेस झाल्या असून 4 शिल्लक आहेत. ज्यातील दोन रेस उद्या पार पडतील.

  • 28 Jul 2021 10:54 AM (IST)

    भारताचा आतापर्यंतचा दिवस

    भारतीय महिला हॉकी संघ ग्रुप स्टेजच्या तिसऱ्या सामन्यात ग्रेट ब्रिटेनकडून 4-1 ने पराभूत 

    पीव्ही सिंधू ग्रुप स्टेजच्या दुसऱ्या सामन्यात हाँगकाँगच्या चीयूंगाविरुद्ध विजयी. 21-9,21-16 च्या फरकाने विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश

    आर्चरी – राउंड ऑफ 64 मध्ये तरुणदीप रॉय 6-4 ने जिंकला पण पुढच्याच फेरीत तो शूट ऑफ मध्ये पराभूत झाला.

    रोविंगमध्ये अरविंद सिंह आणि अर्जुन लाल दुसऱ्या सेमीफायनलमध्ये शेवटच्या स्थानावर राहिले.

  • 28 Jul 2021 10:41 AM (IST)

    सेलिंग – दुहेरी स्पर्धेला सुरुवात

    सेलिंगच्या पुरुष दुहेरीत वरुण आणि गणपति यांच्या जोडीची शर्यत सुरु झाली आहे. दोघेही सध्या 18 व्या स्थानावर आहेत.

  • 28 Jul 2021 10:33 AM (IST)

    बॅडमिंटन – पीव्ही सिंधूचा पुढील सामना डेन्मार्कच्या खेळाडूशी

    आजच्या विजयानंतर आता सिंधूचा पुढील सामना डेन्मार्कच्या मिआ ब्लिकफेडलटसोबत असेल. डेन्मार्कच्या या खेळाडूसोबत सिंधूने यावर्षी दोन सामने खेळले असून एकात सिंधू तर एकात मिओ जिंकली आहे.

  • 28 Jul 2021 10:31 AM (IST)

    बॅडमिंटन – पीव्ही सिंधूचा दुसरा विजय

    पीव्ही सिंधूने सामन्यातील दुसरा विजय मिळवत पुढील फेरी गाठली आहे. यावेळी ती म्हणाली, ‘मला एक चांगली लय मिळाली आहे. आजचा सामना एका मोठ्या सामन्यापूर्वीच्या परीक्षेप्रमाणे होता. ’