Tokyo Olympics 2020 Live: टोक्यो ऑलिम्पकमध्ये आज भारताला निराशा, बॉक्सर पुजा रानीसह पीव्ही सिंधू पराभूत

| Updated on: Jul 31, 2021 | 6:32 PM

Tokyo Olympics 2020 Live Updates: भारताने शनिवारी दुसरं पदक निश्चित केलं. आजही भारताजवळ धनुर्विद्या आणि शूटिंगमध्ये पदक जिंकण्याची संधी असेल.

Tokyo Olympics 2020 Live:  टोक्यो ऑलिम्पकमध्ये आज भारताला निराशा, बॉक्सर पुजा रानीसह पीव्ही सिंधू पराभूत
पीव्ही सिंधू
Follow us on

Tokyo Olympics 2020 Live: टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताचा आजचा नववा दिवस आहे. शुक्रवारचा दिवस देशासाठी पदकाची भेट घेऊन आला. शुक्रवारी भारताचे दुसरे पदक निश्चित झाले आहे. महिला बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनने 69 किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठून भारताला पदक देण्याचं काम करणार आहे. आज, मात्र भारताला निराशा पत्करावी लागत आहे. आधी बॉक्सर अमीक पांघल, त्यानंतर अतनू दास उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभूत झाला. दुसरीकडे, रिओ ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती पीव्ही सिंधूनेही  सेमी फायनलमध्ये पराभूत झाली.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 31 Jul 2021 04:48 PM (IST)

    बॅडमिंटन – दुसऱ्या सेटमधील पराभवासह सामनाही सिंधूने गमावला

    सिंधू पहिल्या सेटमध्ये 21-18 ने पराभूत झाली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही सिंधूला 21-12 ने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सेमीफायनलमध्येच पराभूत झालेल्या सिंधूचं सुवर्णपदकाचं स्वप्नही तुटलं आहे.

  • 31 Jul 2021 04:47 PM (IST)

    पी.व्ही. सिंधूचा पराभव, कांस्य पदकासाठी खेळावं लागणार

    भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिला ऑलम्पिकच्या सेमी फायनलमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पी. व्ही. सिंधूचं आता पुढील लक्ष्य हे कांस्य पदक मिळवणं असणार आहे.


  • 31 Jul 2021 04:21 PM (IST)

    बॅडमिंटन – पहिल्या सेटमध्ये सिंधू पराभूत

    अत्यंत चुरशीच्या झालेल्या पहिल्या सेटमध्ये सिंधू 21-18 च्या फरकाने पराभूत झाली.

  • 31 Jul 2021 04:06 PM (IST)

    बॅडमिंटन – पी. व्ही सिंधूचा सामना सुरु

    पीव्ही सिंधू आणि ताई यिंग यांच्यात सेमी फायनलच्या सामन्याला सुरुवात झाली आहे.

  • 31 Jul 2021 04:05 PM (IST)

    बॉक्सिंग – पुजा रानी पदकापासून हुकली

  • 31 Jul 2021 03:20 PM (IST)

    सेलिंग – 17 व्या स्थानावर केसी गणपति आणि वरुण ठक्कर

    भारताचा केसी गणपति आणि वरुण ठक्करने 49er स्किफ रेसमध्ये 17 वं स्थान पटकावलं. 12 व्या आणि शेवटच्या रेसमद्ये ही जोडी 14 व्या स्थानावर होती.

    एकूण गुण – 174, नेट गुण – 154

  • 31 Jul 2021 01:27 PM (IST)

    अतनु दासने मागितली माफी

    भारताचा पुरुष तिरंदाज अतनु दास आज प्री-क्वार्टरच्या सामन्यात पराभूत झाला. या पराभवासोबतच तो टोक्यो ओलिम्पिक 2020 मधूनही बाहेर झाला. यंदा त्याच्याकडून पदकाची सर्वाधिक आशा होती. असे असताना तो पराभूत झाल्यामुळे त्याने स्वत:च ट्विट करत भारतीय चाहत्यांची माफी मागितली.

  • 31 Jul 2021 12:01 PM (IST)

    भारताचे आजच्या दिवसातील उर्वरीत सामने

    अॅथलेटिक्स : 

    दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी : श्रीशंकर (पुरुष लांब उडी)

    बॅडमिंटन : 

    दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी : पीव्ही सिंधू विरुद्ध ताइ त्जु यिंग (महिला एकेरी सेमीफायनल).

    बॉक्सिंग : 

    दुपारी 3 वाजून 36 मिनिटांनी : पूजा रानी विरुद्ध ली कियान (चीन) (75 किलो महिला प्री-क्वॉर्टर फायनल)

  • 31 Jul 2021 10:49 AM (IST)

    हॉकी (महिला) – भारताची दक्षिण आफ्रिकेवर 4-3 ने मात

    भारतीय महिला संघाने शेवटच्या क्वॉर्टरमध्ये सामन्चयात मिळवलेलेी एका अतिरिक्त गोलची लीड कायम ठेवत सामना 4-3 ने जिंकला. भारतासाठी आज वंदना कटारियाने हॅट्रीक गोल करत विजय मिळवून दिला.

  • 31 Jul 2021 08:21 AM (IST)

    अॅथलेटिक्स (डिस्कस थ्रो) : कमलप्रीत कौर फायनलमध्ये पोहोचली

    कमलप्रीत कौरने आपल्या शेवटच्या अटेंप्टममध्ये 64.00 मीटर की लांबीचा थ्रो केला. या थ्रो मुळे तिला पुढं जायला संधी मिळाली. सीमाचा प्रवास मात्र संपुष्टात आला.

  • 31 Jul 2021 07:44 AM (IST)

    अतनु दासचा पराभव

    शेवटच्या सेटमध्ये अतनु दासचा पराभव झाला. त्याचा प्रवास प्री क्वार्टरफायनलमध्ये संपुष्टात आला…

    पाचवा सेट

    अतनु दास- 9-8-9 (26 गुण)
    ताकाहारु- 9-10-8 (27 गुण)

  • 31 Jul 2021 07:12 AM (IST)

    थोड्याच वेळात अतनु दासचा सामना सुरु होणार

    भारताचा नंबर वन तिरंदाज अतनू दासच्या सामन्याला थोड्या वेळात सुरुवात होतील. अतनू त्याची प्री-क्वार्टर फायनल खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑलिम्पिकमध्ये सध्या तो एकमेव भारतीय तिरंदाज आहे.

  • 31 Jul 2021 06:33 AM (IST)

    अॅथलेटिक्स : सीमा पुनियाकडून सुरुवात

    सीमा पुनियाने डिस्कस थ्रोने सुरुवात केली आहे. ती तिच्या गटात प्रथम आली. मात्र, काहीही फायदा झाला नाही, सीमाच्या प्रयत्नांना लाल झेंडा दाखवण्यात आल्याने त्याचा फायदा नाही.

  • 31 Jul 2021 06:31 AM (IST)

    Tokyo Olympics 2020 : महत्त्वाचा ऑलिम्पिक रेकॉर्ड

  • 31 Jul 2021 06:29 AM (IST)

    Tokyo Olympics 2020 : भारताचं आजचं पूर्ण शेड्यूल पाहा…