टोकियो: जपानमधील टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलम्पिकच्या सातव्या दिवशी भारताला मोठा झटका बसला आहे. सहावेळा विश्वविजेती राहिलेली भारतीय बॉक्सर मेरिकोमला पराभवाचा सामना करावा लागला आहे. फायनल 16 मध्ये मेरिकोमचा पराभव झाला आहे. 2016 च्या रिओ ऑलम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या इंग्रिट वालेंसियानं मेरिकोमचा पराभव करत उपउपात्य फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे आजच्या पराभवामुळे मेरिकोमचं ऑलम्पिकमधील दुसरं पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे.
आजच्या सामन्यात इंग्रिटा वालेंसिया पहिल्या राऊंडपासून आक्रमक असल्याचं पाहायला मिळाले. तिच्या आक्रमक खेळीमुळे आजच्या सामन्यात तिनं विजय मिळवला. मेरिकोमनं तिच्या अनुभवाचा वापर करत दुसऱ्या राऊंडमध्ये विजय मिळवला. मात्र, तिसऱ्या राऊंडनंतर इंग्रिटा वालेंसियाच्या बाजूनं सामन्याचा निकाल लागला. मेरिकोमला 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला.
पीव्ही सिंधूने दुसरा सेट 21-13 ने सहज जिंकला आणि अवघ्या 41 मिनिटांत हा सामना जिंकला. सिंधूने आता उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तिने 21-15, 21-13 असा सामना जिंकून स्वत: ला सिद्ध केले आहे. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच सिंधूला इथेही फार कष्ट घ्यावे लागले नाहीत.
सतीश कुमारने जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनला 4-1 ने पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. सतिश कुमार पदकापासून फक्त एक पाऊल दूर आहे.
शेवटच्या क्षणी मिळालेल्या कॉर्नरवरुन हरमनप्रीत सिंगने भारतासाठी गोल करत भारताचा विजय निश्चित केला. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनाला 3-1 ने हरवलं पराभूत केलं.
आतापर्यंतच्या खेळावर जर आपण नजर टाकली तर पदकांच्या आकडेवारीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. दुसर्या स्थानावर चीन आहे तर जपान तिसर्या क्रमांकावर आहे.
1) अमेरिका – 13 गोल्ड, 12 सिल्वर, 10 ब्रॉन्ज, एकूण 35 मेडल
2) चीन – 13 गोल्ड, 06 सिल्वर, 09 ब्रॉन्ज, एकूण 28 मेडल
3) जपान – 13 गोल्ड, 04 सिल्वर, 05 ब्रॉन्ज, एकूण 22 मेडल
इतर बातम्या:
(Tokyo Olympics 2021 Indian boxer Mary Com lost Columbia boxer Ingrit Valencia defeated her )