Tokyo Olympics 2020 : ऑलिम्पिकमध्ये भारत आज प्रचंड ‘आशावादी’, या खेळाडूंकडून गोल्ड मेडलची आशा, पाहा कशा असतील मॅचेस..

| Updated on: Jul 24, 2021 | 7:32 AM

Tokyo Olympics 2020 : भारत आज काही स्पर्धांमध्ये आपले नशीब आजमावत आहे... ज्यामध्ये असे काही खेळाडू आहेत की जे भारतासाठी पदक जिंकून देऊ शकतात...

Tokyo Olympics 2020 : ऑलिम्पिकमध्ये भारत आज प्रचंड आशावादी, या खेळाडूंकडून गोल्ड मेडलची आशा, पाहा कशा असतील मॅचेस..
Tokyo Olympics 2020
Follow us on

Tokyo Olympics 2020 : टोकियो ऑलिम्पिक 2020 ची सुरुवात झालेली आहे… आज शनिवार… स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे… भारतासाठी स्पर्धेचा पहिला दिवस निराशाजनक राहिला… भारतीय तिरंदाज रँकिंग ग्राउंड मध्ये काही खास कामगिरी करु शकले नाहीत… भारत आज काही स्पर्धांमध्ये आपले नशीब आजमावत आहे… ज्यामध्ये असे काही खेळाडू आहेत की जे भारतासाठी पदक जिंकून देऊ शकतात… भारताकडून पदकासाठी सर्वात मोठी आशा आहे ती शूटर सौरभ चौधरी आणि महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू… दुसऱ्या दिवशी या दोन खेळाडूंकडून भारताला पदकाची आशा असेल आज दुसऱ्या दिवशी भारत तिरंदाजी, बॅडमिंटन, हॉकी, शूटिंग, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, टेनिस खेळणार आहे.

वेटलिफ्टिंग, शूटिंग आणि तिरंदाजीमध्ये दुसर्‍या दिवशी मेडल राऊंड होणार आहेत. आजच्या दिवशी भारताचं पदकाचं खातं उघडलं जाईल, अशी अपेक्षा केली जात आहे. दुसऱ्या दिवशी भारताचा संपूर्ण कार्यक्रम कसा असेल, हे आपण पाहुयात…

अशा प्रकारे भारताचा संपूर्ण कार्यक्रम असणार (भारतीय वेळेनुसार)

तिरंदाजी :

दुपारी 12:55 वाजता – कांस्य पदक मॅच

दुपारी 13:15 वाजता – सुवर्ण पदक मॅच

बॅडमिंटन :

सकाळी 8:50 वाजता – पुरुषांच्या ग्रुप ए मॅचमध्ये सात्विकसाईराज रंकीरेड्डी / चिराग शेट्टी बनाम यांग ली / ची-लिन वांग

सकाळी 9:30 वाजता – पुरुष व्यक्तिगत ग्रुप डी मॅचमध्ये बी साई प्रणीत विरुद्ध मिशा जिल्बरमैन (इस्राईल)

बॉक्सिंग :
दुपारी 3:45 बजे- 69 किलोग्रॅम अंतिम 32 विकास कृष्ण विरुद्ध सेवोनरेट्स क्विंकी मेनसाह ओकाजावा (जापान)

हॉकी :

सकाळी 6:30 वाजता – पुरुषांच्या पूल ए मॅचमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड

सकाळी 5:15 वाजता- महिला पूल ए मॅचमध्ये भारत विरुद्ध नेदरलैंड

जूडो : सकाळी 7:30 वाजता सुरु होणार

दिवसाची 10 वी स्पर्धा: महिलांच्या 48 किग्रॅ वर्गाच्या अंतिम 32 मॅचमध्ये सुशीला देवी लिकमबम विरुद्ध इवा सेरनोविस्की (हंगेरी)

रोइंग :

सकाळी: 7:30 वाजता- पुरुषांच्या लाइटवेट डबल स्कल्सच्या दुसऱ्या हीटमध्ये अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंह

शूटिंग :

सकाळी 05:00 वाजता : महिलांच्या 10 मीटर एयर रायफल क्वालीफिकेशनमध्ये अपूर्वी चंदेला आणि इलावेनिल वालारिवन

सकाळी 07:15 वाजता: महिलांच्या 10 मीटर एयर रायफल फायनल

सकाळी 09:30 वाजता: पुरुषांच्या 10 मीटर एयर रायफल क्वालिफिकेशनमध्ये अभिषेक वर्मा आणि सौरभ चौधरी

दुपारी 12 वाजता : पुरुषांच्या 10 मीटर एयर रायफल फायनल

टेबल टेनिस :

सकाळी 8:30 बजे: मिक्स्ड प्री-क्वार्टर फायनल मॅचमध्ये अचंता शरत कमल आणि मनिका बत्रा बनाम यूं जू लिन आणि चिंग चेंग

दुपारी 12:15 वाजता : महिला व्यक्तिगत मनिका बत्रा विरुद्ध टिन-टिन हो (ग्रेट ब्रिटेन)

दुपारी 01:00 वाजता : महिला व्यक्तिगत सुतीर्था मुखर्जी विरुद्ध लिंडा बर्गस्ट्रोम (स्वीडन)

टेनिस :

सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरु

दिवसाची दुसरी मॅच: पुरुष व्यक्तिगत मॅचमध्ये सुमित नागल विरुद्ध डेनिस इस्तोमिन (उज्बेकिस्तान)

वेटलिफ्टिंग :

सकाळी: 10:20 वाजता: महिलांच्या 49 किग्रॅ वजनी गटात मीराबाई चानू

(Tokyo Olympics 2021 Second Day Schedule of indian player Saurabh Tiwari mirabai Chanu Deepika Kumari)

हे ही वाचा :

Tokyo Olympics 2021 : 24 जुलै भारतासाठी यंदाच्या ऑलिम्पिकमधील महत्त्वाचा दिवस, ‘हे’ आहे कारण

Tokyo Olympics 2021 : ‘हा’ बॉलीवूड सुपरस्टार बनला चीयरलीडर, ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचे वाढवणार प्रोत्साहन