मुंबई : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये यंदा अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. भारताने 7 पदकं पटकावली. यामध्ये 4 कांस्य, 2 रौप्य आणि एका सुवर्णपदकाचा समावेश होतो. पण या सर्वाची सुरुवात केली, ती म्हणजे भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानूने (Mirabai Chanu). ऑलिम्पिकच्या दुसऱ्याच दिवशी वेटलिफ्टर मीराबाईने 49 किलोग्राम महिला वर्गात अप्रतिम कामगिरी करत रौप्य पदकाची कमाई केली. त्यानंतर काय देशभरातून तिच्यावर बक्षिसांचा आणि कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. पण मीराबाईला मिळालेल्या या यशासाठी तिने केलेली मेहनत उल्लेखनीय आहे. मीराबाईचा आज वाढदिवस असल्याने तिच्या संघर्षाची कहानी थोडक्यात जाणून घेऊया…
मीराबाईचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 8 ऑगस्ट, 1994 रोजी मणिपूर येथे झाला होता. पाच भावंड असणाऱ्या मीराबाईच्या कुटुंबात जेवणासाठी जळण आणण्याचे काम मुलींकडे असायचे. यावेळी मीराबाई अगदी सहजपणे भरपूर वजनाची लाकडं उचलायची. त्याच ठिकाणी तिला सर्वात आधी तिच्या ताकदीची जाणीव झाली.
खेड्यात राहणाऱ्या मिराबाईच्या मनात वेटलिफ्टिंग करण्याचा विचार भारताची महान वेटलिफ्टर कुंजरानी देवी यांच्याकडून आला. मीराबाईने आठवीत असताना कुंजरानी यांची गोष्ट वाचली. ज्यानंतर ती तिने वेटलिफ्टर बनण्याचे ठरवले. आज या निर्णयाला सार्थ करत तिने ऑलिम्पिक मेडल मिळवलं आहे.
मीराबाई सरावासाठी जाण्याकरत ट्रक ड्रायव्हर्सची मदत घेत असेय. ट्रेनिंग सेंटर तिच्या गावापासून 22 किलोमीटर दूर होतं. मीराबाईच गाव नोंगपोक काकचिंग एका बाजूला असल्याने ट्रेनिंग सेंटपर्यंत जाण्यासाठी मीराबाईकडे जास्त सुविधा नव्हत्या. त्यामुळे ती ट्रक ड्राय़व्हर्सची मदत घेत. विजयानंतर तिने त्यांचेही आभार मानले
49 किलोग्राम वर्गात महिला वेटलिफ्टिंगची सुरुआत स्नॅच राउंडने झाली. ज्यात मीराबाईने पहिल्या प्रयत्नात 81 किलोग्राम वजन उचललं. ज्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 87 किलोग्राम वजन उचलंल. तिसऱ्या प्रयत्नात तिने 89 किलोग्राम वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण ती अयशस्वी ठरली आणि केवळ 87 किलोग्रामच उचलू शकली. त्यामुळे स्नॅच राउंडमध्ये ती दुसरी आली. त्यात चीनच्या जजिहु हिने 94 किलो वजन उचलत पहिला क्रमांक पटकावला.
त्यानंतर क्लीन अँड जर्क राउंडची सुरुवात झाली आमि मीराबाईने पहिल्या प्रयत्नातच अप्रतिम कामगिरी करत 110 किलो वजन उचलला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 115 किलो वजन उचललं. पण अखेरच्या तिसऱ्या प्रयत्नात 117 किलो वजन उचलण्यात ती अयशस्वी ठरली. ज्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. तर चीनच्या जजिहुने क्लीन अँड जर्कमध्ये 116 किलो वजन उचलत सुवर्ण पदक जिंकलं.
इतर बातम्या
सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधीच्या रोख रकमेसह गाडी आणि बरंच काही
(Tokyo Olympics Silver medal Winner Mirabai chanu birthday today)