टोकियो : टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये (Tokyo Paralympics) भारतासाठी आजचा दिवस पुन्हा एकदा धडाकेबाज ठरला आहे. कारण आज भारताच्या खात्यात एक सुवर्ण (Gold Medal) दोन रौप्य आणि एक कांस्य पदक जमा झालं. महिला नेमबाज अवनी लेखराने (Avani Lekhara) 10 मीटर एयर स्टँडिंग प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. त्याशिवाय थाळीफेक प्रकारात योगेश कथुनिया (Yogesh Kathuniya) रौप्य (Gold Medal) कामगिरी केली. तर भालाफेक प्रकारात देवेंद्र झझारीयाने (Devendra Jhajharia) रौप्य आणि सुंदर सिंग गुर्जरने (Sundar Singh Gurjar) कांस्य पदक पटकावलं.
योगेश कथुनियाने पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत धमाका केला. योगेशने F56 प्रकारात रौप्य पदक पटकावलं. योगेशचं पदक निश्चित होताच, मैदानात भारत माता की जयचा नारा घुमला. योगेशने 44.38 मीटर थाळीफेक करुन, आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. टोकियो पॅरालिम्पिक्समधील भारताचं हे पाचवं मेडल ठरलं. योगेशने आपल्या सहा फेऱ्यांमध्ये 42.84, 43.55, 44.38 मीटपर्यंत थाळीफेक केली.
नऊ वर्षापर्यंत सामान्य आयुष्य जगणाऱ्या योगेश कथुनियाला 2006 मध्ये व्हिलचेअरवर यावं लागलं. त्याला पुन्हा उभं करण्यासाठी फिजिओथेरिपी सुरु करण्यात आली. त्यासाठी त्याची आई स्वत: फिजिओथेरेपी शिकली. तीन वर्षानंतर आईच्या मेहनतीला यश आलं, योगेश पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला. योगेशने टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये जो कारनामा केला आहे, तो पाहून, त्याच्या कौतुकासाठी आज अख्खा देश त्याच्या पाठिशी उभा राहिला आहे.
योगेश कथुनियाने 2019 मध्ये दुबईत झालेल्या वर्ल्ड पॅरा अॅथसेटिक्स चॅम्पियन्सशिपमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. त्यामुळे त्याला टोकियो पॅरालिम्पिक्सचं तिकीट मिळालं. या स्पर्धेत त्याने पुढची मजल मारुन, रौप्य पदकाची कमाई केली. योगेशने पॅरा स्पोर्ट्समध्ये पहिल्यांदा सर्वांचं लक्ष 2017 मध्ये वेधलं होतं.
योगेशची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 2018 पासून सुरु झाली. आशियाई स्पर्धेत योगेशने जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने चौथ्या स्थानापर्यंत मजल मारली होती. त्यानंतर बर्लिनमध्ये पॅरा अॅथलिट ग्रां प्रीमध्ये योगेशने थाळीफेकीच्या F36 प्रकारात 45.18 मीटर थाळीफेक करुन, वर्ल्ड रेकॉर्ड केलं होतं. टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये योगेश पहिल्यांदाच खेळत होता, पहिल्याच प्रयत्नात त्याने रौप्य पदक पटकावलं.
भारताच्या देवेंद्र झझारिया आणि सुंदर सिंग गुर्जर यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक पटकावलं. भालाफेकीच्या F46 प्रकारात या दोघांनी भारताला पदकं मिळवून दिली.
Shri #DevendraJhajharia Jhajharia and Shri #SundarSingh Gurjar clinch #Silver and #Bronze respectively in Men’s Javelin Throw F46 event at Tokyo
Many Congratulations to #RealHeroes for making our NATION Proud !!#TokyoParalympics#Paralympics#Praise4Para pic.twitter.com/JvF7aBwfTC
— MAHA INFO CENTRE (@micnewdelhi) August 30, 2021
टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये (Tokyo Paralympics) भारताने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत महिला नेमबाज अवनी लेखराने (Avani Lekhara) सुवर्णवेध घेतला आहे. भारताच्या खात्यातील हे पहिलं गोल्ड मेडल (Gold Medal) आहे. अवनी लेखराने 10 मीटर एयर स्टँडिंग प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. अवनीच्या या कामगिरीने तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन, अवनीवर स्तुतीसुमनं उधळली. तर भारताच्या योगेश कठुनिया यानेही थाळीफेकीत भारताला रौप्यपदक मिळवून दिलं.
संबंधित बातम्या
Tokyo Paralympics 2020 : भारताच्या अवनी लेखराचा सुवर्णवेध, पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन केलं कौतुक