Tokyo Paralympics 2020: भारतीय खेळाडूंसाठी आजचा दिवस (31 ऑगस्ट) टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympic 2020) काही खास जात नव्हता. एका मागोमाग एक पदकाचे प्रबळ दावेदार असणारे खेळाडू पराभूत होत होते. पण याचवेळी भारताचा नेमबाज सिंगराज अधाना (Singhraj Adhana) यानं कांस्यपदकावर नाव कोरत भारताला दिवसाचं पहिलं तर स्पर्धेतील आठवं पदक मिळवून दिलं.
टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेतील नेमबाजी 10 मीटर एअर पिस्तुल एसएच1 गटाच्या अंतिम फेरीत सिंगराजनं हे यश मिळवलं. सिंगराजनं 216.8 गुणांसह हे कांस्यपदक मिळवलं आहे. याच स्पर्धेत पात्रता फेरीत अव्वल येत भारताचा मनीष नरवालही फायलनमध्ये आला होता. पण तो पदकापासून थोडक्यात हुकला आहे. तर स्पर्धेतील सुवर्ण आणि रौप्य ही दोन्ही पदकं चीनच्या नेमबाजांनी मिळवली आहेत.
#Bronze for #IND Singhraj ?He was out of the medal position and with the 20th shot he got into the top three. Just WOW ? #Paralympics #Shooting pic.twitter.com/cLmeOWl4IG
— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 31, 2021
भारताची नेमबाज रुबिना फ्रान्सिस महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल एसएच1 च्या फायनलमध्ये सातव्या स्थानावर राहिली. रूबिनाने असाका शूटिंग रेंजमध्ये फायनलमध्ये 128.1 गुण मिळवले. एसएच1 वर्गात निशानेबाज केवळ एका हाताने पिस्टल पकडतात. त्यांच्या एका हातात किंवा पायात विकार असतो. दरम्यान या स्पर्धेत इरानची सारेह जवानमार्दी 239.2 गुणांसह सुवर्णपदक पटकावण्यात यशस्वी झाली.
भारताने आतापर्यंत 7 पदकं मिळवली आहेत. ज्यामध्ये दोन सुवर्णपदकांसह चार रौप्य आणि एक कांस्य पदकांचा समावेश आहे. आता सिंगराजच्या या विजयामुळे भारताकडे एक कांस्य पदक आणखी आलं आहे. ज्यामुळे भारताच्या खात्यात एकूण 8 पदकं झाली आहेत.
हे ही वाचा
Tokyo Paralympics मध्ये भारताची सुवर्ण भालाफेक, सुमित अंतिलने जिंकलं सुवर्णपदक, दिवसभरातील पाचवं पदक
Tokyo Paralympics मध्ये भारताला मोठा झटका, विनोद कुमारला कांस्य पदक परत करण्याची वेळ
IND vs ENG : चौथ्या कसोटी सामन्यात सूर्यकुमारला जागा नाही, माजी क्रिकेटपटूने सांगितले कारण