ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी टीममध्ये बदल केला आहे. पहिला बदल सलामीच्या जोडीमध्ये आहे. दुसरा बदल गोलंदाजीत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियात उर्वरित दोन कसोटी सामने मेलबर्न आणि सिडनीमध्ये खेळले जाणार आहेत. मेलबर्नबमध्ये 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डे टेस्ट सुरु होणार आहे. सिडनीमध्ये न्यू ईयर टेस्ट मॅच होणार आहे. दोन्ही टीम्समध्ये पाच टेस्ट मॅचची सीरीज होणार आहे. सध्या सीरीजमध्ये दोन्ही टीम्स 1-1 अशा बरोबरीत आहेत.
बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यातून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड बाहेर गेला आहे. दुखापतीमुळे तो खेळू शकणार नाहीय. हेझलवूडला ब्रिसबेनमध्ये तिसऱ्या कसोटीमध्ये दुखापत झाली. ऑस्ट्रेलियन टीममध्ये हेझलवूडच्या जागी झाय रिचर्डसनचा समावेश केला आहे.
दुसरा बदल कुठल्या स्थानावर?
वेगवान गोलंदाजीशिवाय टीममध्ये दुसरा बदल ओपनिंग जोडीमध्ये करण्यात आला आहे. मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियन सलामीवीरांची जोडी बदलेली दिसेल. MCG वप उस्माम ख्वाजासोबत नाथन मॅक्स्विनी ऑस्ट्रेलियन डावाची सुरुवात करताना दिसणार नाही. ऑस्ट्रेलियन टीमच्या सिलेक्टर्सनी शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी मॅक्स्विनीच्या जागी सॅम कॉन्सटासला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. भारता विरुद्ध प्रॅक्टिस मॅचमध्ये चांगली कामगिरी केली म्हणून सॅम कॉन्सटासला ही संधी मिळाली आहे.
आतापर्यंत प्रदर्शन कसं?
टीम इंडियाने पहिली पर्थ कसोटी जिंकून दमदार सुरुवात केली होती. त्यानंतर एडिलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने पुनरागमन केलं. ब्रिस्बेन कसोटीत बराचसा खेळ पावसामुळे वाया गेला. तिसऱ्या कसोटीतही ऑस्ट्रेलियन टीम पहिल्या डावातील आघाडीमुळे चांगल्या स्थितीत होती. पण दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला ती लय राखता आली नाही. भारताच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचे सात फलंदाज तंबूत परतले होते.
भारताविरुद्ध शेवटच्या दोन टेस्टसाठी ऑस्ट्रेलियन टीम
पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, ट्रेविस हेड, स्टीव स्मिथ, शॉन एबट, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, सॅम कॉन्सटास, झाय रिचर्डसन, जॉश इंग्लिश, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, मिचेल मार्श, मिचेल स्टार्क, ब्यू वेब्स्टर