नवी दिल्ली : सलग 2 वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन, वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त मेडल…. कुठल्याही खेळाडूला आपल्या करिअरमध्ये अजून काय हवं?. मान, सन्मान यश आणि कोट्यवधींची संपत्ती. एखाद्या खेळाडूकडे असं शानदार करिअर असेल, तर त्याला ते लांबवायच असतं. महत्त्वाच म्हणजे वय जास्त नसेल, तर कुठल्याही खेळाडूला जास्त वेळ खेळायच असतं. वयाची 35 शी ओलांडल्यानंतरही एखाद्या एथलीटला खेळायच असतं. पण अलेक्जेंड्रे बिलोडो अशा खेळाडूंपैकी आहे, ज्याने करिअरच्या शिखरावर असताना निवृत्ती स्वीकारली.
शानदार फॉर्ममध्ये असताना बिलोडोने निवृत्ती स्वीकारली. त्यावेळी बिलोडो ज्या टुर्नामेंटमध्ये उतरायचा, तिथे पदकविजेती कामगिरी करायचा. 8 सप्टेंबर 1987 रोजी कॅनडामध्ये बिलोडोचा जन्म झाला. तो माजी फ्रीस्टाइल स्कीयर होता. त्याने वयाच्या 18 व्या वर्षीच डेब्यु केला.
किताबाच रक्षण करणारा पहिला खेळाडू
डेब्यु केल्यानंतर काही काळातच बिलोडोची जगभरात चर्चा सुरु झाली. पाहता, पाहता तो कॅनडाचा यशस्वी स्कीयर बनला. त्याने 2010 आणि 2014 साली विंटर ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकलं. फ्रीस्टाइल स्कीइंगमध्ये आपल्या ऑलिम्पिक किताबाचा बचाव करणारा तो पहिला खेळाडू ठरला. याच बिलोडोने कॅनडासाठी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक मेडल जिंकले. आजपासून बरोबर 9 वर्षांपूर्वी 21 मार्च 2014 रोजी तो वर्ल्ड कपमध्ये उतरला. विजयासह त्याने निवृत्ती स्वीकारली.
इतक्या कोटींची संपत्ती
सन्यास घेताना बिलोडोचे वय फक्त 26 वर्ष होतं. त्यावेळी तो त्याच्या करिअरच्या शिखरावर होता. अनेक मेडल जिंकण्याच त्याचं वय होतं. पण सन्यास घेऊन त्याने सगळ्यांनाच धक्का दिला. क्रीडा विश्वातून निवृत्ती घेतल्यानंतर या ऑलिम्पिक चॅम्पियनने आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलं, अकाऊंटसचा अभ्यास केला. कमी वयात सन्यास घेणाऱ्या बिलोडोने तो पर्यंत कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. त्याची नेटवर्थ 11 कोटीच्या घरात होती.